For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी सुधा आंगणे

04:24 PM Apr 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी सुधा आंगणे
Advertisement

मसुरे प्रतिनिधी

Advertisement

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी आंगणेवाडी गावचे सुपुत्र आणि कामगार नेते नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड मुंबई दादर येथे जाहीर करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांचीही निवड करण्यात आली आहे.नारायण उर्फ सुधा आंगणे गेली अनेक वर्ष कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे मुंबई येथे नेतृत्व करत आहेत. लार्सन अँड टुब्रो या कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले होते. उबाठा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आंगणे यांनी अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला होता. सामाजिक तसेच कला क्रीडा क्षेत्रामध्ये आंगणेवाडी सहित परिसरामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी मुंबई येथे नोकरी उपलब्ध करून दिली होती. यावेळी बोलताना सुधा आंगणे म्हणालेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत आणि इतर सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून काम करताना सर्व कामगारांना योग्य ते सहकार्य आणि त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण तन मन धन अर्पण करून काम करणार असून उबाठा शिवसेना पक्ष वाढीसाठी आपला नेहमीच प्रयत्न राहील. आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने मिळालेल्या पदाला योग्य तो न्याय देईन. सुधा आंगणे यांच्या या अभिनंदन निवडीबद्दल आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाळा आंगणे, माजी अध्यक्ष भास्कर आंगणे, आनन आंगणे, गजानन उर्फ बाबू आंगणे, सुनील आंगणे, सतीश आंगणे, बाब्या आंगणे, प्रसाद आंगणे, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मसुरे पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.