सुदीप फार्माचे समभाग 730 रुपयांवर सुचीबद्ध
कंपनीचे बाजारमूल्य 8,189 कोटींच्या घरात
वृत्तसंस्था/ मुंबई
सुदीप फार्माचा समभाग 28 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात 730 रुपयांवर सूचीबद्ध झाला. जो 593 रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा 23 टक्के जास्त आहे. तो सध्या 779 रुपयांवर व्यवहार करत आहे, जो 33 टक्के जादा आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचे समभाग हे 725 रुपयांवर सूचीबद्ध झाले.
आयपीओ किंमत 563 ते 593 दरम्यान निश्चित केली होती. लिस्टिंगनंतर, कंपनीचे बाजार मूल्य वाढून 8,188 कोटी झाले आहे. पूर्वी, ते 6,697 कोटी रुपये होते. आयपीओमध्ये 95 कोटी रुपयांचा नवीन इश्यू, 800 कोटी रुपयांचा ओएफएस समाविष्ट आहे. तरीही, गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला आणि इश्यू 93.71 वेळा सबक्राइब झाला. नव्या इश्यूमधून मिळालेल्या रकमेपैकी 75.8 कोटी रुपये गुजरातमधील नंदेसरी फॅसिलिटी-1 मधील उत्पादन लाइनसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील.