For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

10 वर्षे अंडी दिल्यावर अचानक होतो नर

06:49 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
10 वर्षे अंडी दिल्यावर अचानक होतो नर
Advertisement

खोल समुद्रात दडलेल्या रहस्यांमुळे माणूस वारंवार अचंबित होत असतो. जपानच्या सागरी रीफ्समध्ये राहणारा कोबुदाई मासा याच अनोख्या चमत्कारांपैकी एक आहे. हा मासा जन्मापासून जवळपास 10 वर्षांपर्यंत मादी राहतो आणि अंडी देतो. परंतु 10 वर्षांनी त्यात एक भयानक आणि हिंसक जैविक परिवर्तन होते आणि अचानक नरात बदलून जातो.

Advertisement

वैज्ञानिक भाषेत याला सीक्वेंशियल हर्माप्रोडीटिसम म्हटले जाते. कोबुदाई प्रथम शांत आणि साधारण दिसणारी मादी असतो. परंतु वय वाढण्यासोबत त्याचे शीर मोठे आणि अवजड होत जाते. जबडे मजबूत होतात, रंग दाट होत जातो आणि तो आक्रमक नर होतो. नर झाल्यावर तो कळपाचा प्रमुख होत असतो.

निसर्गाने या माशाला अशाप्रकारे डिझाइन केले आहे की प्रजननाचे यश वाढू शकेल. छोट्या वयात मादी राहून अधिक अंडी देत असतो. तर शरीर मोठे आणि मजबूत होताच तो नर होत इतर मादी माशांचे रक्षण करू शकतो. हा बदल इतका तीव्र होतो, की वैज्ञानिकांनी याला ‘व्हायोलेंट बायोलॉजिकल क्लॉक’ नाव दिले आहे.

Advertisement

दिसण्यास अत्यंत अजब

कोबुदाईचा चेहरा माणसासारखा दिसतो, ज्यामुळे त्याला कधीकधी ‘फिश विथ ह्यूमन फेस’ही म्हटले जाते. नर झाल्यावर त्याचे शीर आणखी मोठे होते, जे इतर नरांशी लढण्यास उपयुक्त ठरते. हा मासा जपानच्या सागरी क्षेत्रांमध्ये आढळून येतो आणि तेथील सागरी जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. परंतु मादीचा नर होणारा कोबुदाई एकमात्र नाही. समुद्रात असे अनेक मासे अन् जीव आहेत, जे जेंडर बदलू शकतात, क्लाउनफिश देखील याच प्रक्रियेचे उदाहरण आहे. परंतु कोबुदाईचा बदल आकार आणि आक्रमकतेप्रकरणी सर्वात प्रभावशाली मानला जातो.

Advertisement
Tags :

.