For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजगावातील युवकाचे आकस्मिक निधन

05:40 PM Jul 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
माजगावातील युवकाचे आकस्मिक निधन
Advertisement

माजगाव गावावर शोककळा

Advertisement

ओटवणे |  प्रतिनिधी
माजगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा जय शंभो कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश कृष्णा सावंत (४३) या तरुणाचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले.त्याच्या निधनाचे वृत्त समजतात माजगाव गावावर शोककळा पसरली. त्याच्या आकस्मित व अकाली निधनाचा मित्र परिवारासह सर्वांनाच धक्का बसला. सावंत कुटुंबीयावर तर दुःखाचा डोंगरत कोसळला. मंगळवारी राकेशला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सुरवातीला कोलगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री अधिक उपचारासाठी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्यामुळे मध्यरात्री गोवा धारगळ येथील हॉस्पिटल मध्ये त्याला हलवीण्यात आले. मात्र त्याचे उपचार सुरू असतानाच तीनच्या सुमारास निधन झाले.राकेश जय शंभो मजूर संस्थेचा चेअरमन होता. माजगावच्या धार्मिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात तो नेहमी अग्रस्थानी असायचा. त्यामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्याच्या आकस्मित निधनाचा सर्वांच्याच मनाला चटका लागला. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ, एक बहीण, भावजय, पुतणे असा परिवार आहे. खाजगी बस चालक शैलेश आणि राजेश सावंत यांचे ते भाऊ होत तर सावंतवाडी सालाईवाडा येथील ब्युटी पार्लरच्या चालक रिया सावंत यांचे ते पती होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.