Hupri | हुपरीत चांदी व्यापाऱ्याचा अकस्मिक मृत्यू; परिसरात खळबळ
हुपरीत चांदी देवाण-घेवाणीनंतर व्यापाऱ्याचा मृत्यू
हुपरी - व्यापाऱ्याला मागविलेली चांदी देण्यासाठी सेतम येथून आलेल्या एका तरुण चांदी व्यापाऱ्याचा अकस्मिक मृत्यू झाला. - शिवम निवास जाधव (वय २५, रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.
यासंदर्भात, हुपरी आणि परिसरात मृत्यू संशयास्पद असल्याची उलटसुलट चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम निवास जाधव यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील घोटी बुद्रुक आहे. मात्र चांदीचा व्यापार करण्यासाठी सेलम या ठिकाणी वास्तव्यास होता. हुपरीतील चांदीच्या व्यापाऱ्यांना स्कमेच्या बदल्यात शुद्ध चांदीचा गट देण्यासाठी बुधवारसकाळी पावणे नऊ वाजता आशिष मोरे या चांदी व्यापाऱ्याच्या दुकानात आला होता. चांदी देवाण-घेवाण करून बाहेर दारात येताच चक्कर आल्याने तो दारातच जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ त्या चांदी व्यापायाच्या घरातील लोकांनी दुपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शिवम हा चांदीची देवाण-घेवाण करण्याचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याचे इतर राज्यांतील व्यापाऱ्यांशीडी मोठ्या प्रमाणात व्यवहार होते. त्याच्या आकस्मिक मृत्यूने हुपरीत खळबळ उडाली आहे. शिवम जाधव याच्या मृतदेहाचे प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी कोणाचीही तक्रार नसल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही..