Karad : कराडमधील पोलीस कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू
कराड पोलिस प्रवीण काटवटे यांचे आकस्मिक निधन
कराड: शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. दक्षिण तांबवे, ता. कराड) या पोलीस कर्मचाऱ्याचा रविवारी दुपारी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी आकस्मिक मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण काटवटे हे शहर पोलीस ठाण्यात सन २०१८ पासून कार्यरत होते. सन १९९७ च्या सुमारास ते पोलीस दलात भरती झाले होते. रविवारी ते कुटुंबीयांसोबत मुंबईतील एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गेले होते.
त्याचवेळी अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रात्री उशिरापर्यंत मुंबईतील स्थानिक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन तसेच अन्य कायदेशीर सोपस्कर पार पाडण्याची प्रक्रिया सुरू होती. काटवटे यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार असल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.