For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुखापतीतून सावरत सुदर्शनचे अर्धशतक

06:46 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुखापतीतून सावरत सुदर्शनचे अर्धशतक
Advertisement

कुशाग्र  आणि कोटियन चमकले, इंडिया ए 257 धावा 5 बाद

Advertisement

वृत्तसंस्था, पुद्दुचेरी

मंगळवारी येथे सुरू झालेल्या पहिल्या चार दिवशीय सामन्याच्या पहिल्या दिवशी, इंडिया ए संघाने सुरुवातीचे धक्के पचवत ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध 5 बाद 257 धावांची समाधानकारक मजल मारली. यात कसोटीपटू साई सुदर्शन, कुमार कुशाग्र आणि तनुष कोटियन यांनी संयमी अर्धशतके झळकावली.

Advertisement

दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा कोटियन (68 धावा, 134 चेंडू) आणि शम्स मुलानी (10 धावा, 43 चेंडू) खेळट्टीवर टिकून होते. कोटियनने कुशाग्रसोबत (160 चेंडूत 82 धावा) सहाव्या गड्यासाठी 138 धावांची भागीदारी केली. एका महिन्याहून अधिक काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या सुदर्शननेही 103 चेंडूत 57 धावा करत पुनरागमन संस्मरणीय केले. मात्र यजमान संघाची अवस्था एका वेळी 5 बाद 97 अशी बिकट झाली होती. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात अर्धातास उलटून गेल्यानंतर कोटियन आणि कुशाग्रह यांनी संघाला सावरले. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनसाठी शतक झळकावणाऱ्या कुशाग्रहने ऑस्ट्रलिया अ च्या अनुभवी गोलंदाजीचा (ज्यात कसोटी गोलंदाज ब्रेंडन डॉगेट आणि टॉड मर्फी यांचा समावेश होता) समर्थपणे सामना केला.

झारखंडच्या या फलंदाजाने व्ही. क्षेत्रात आणि कव्हर्सच्या दिशेने सुरेख फटके मारत 103 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वास्तविक 21 वर्षीय कुशाग्रह फिरकी गोलंदाज कोरी रोचिचिओलीच्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने चौकार मारून सुरुवात केली होती. पण लवकरच त्याने संयमी लयीत फलंदाजी करण्यास सुरुवात केली. तथापि, कुशाग्रह शतकापर्यंत मजल मारता आली नाही. स्नायुंच्या पेटके आल्यासारख्घ्s वाटल्याने त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. 90 चेंडूत अर्धशतक पूर्ण कणाऱ्या कोटियानने दिवसाच्या अखेरपर्यंत फलंदाजी सुरु ठेवली. इतकेच नव्हे तर फिरकीपटू मर्फीच्या गोलंदाजींवर कव्हर्सच्या दिशेने चौकार मारुन त्याने आपली ताकद आणि अचूक टायमिंगची झलक दाखविली.

कोटियन आणि कुशाग्रह यांनी इंडिया एलला सावरण्यापूर्वी, यजमान संघाची मदार सुदर्शनच्या संयमी अर्धशतकावर होती. पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीमळे श्रीलंकेचा अलिकडील कसोटी दौरा आणि दुलीप ट्रॉफीला मुकलेल्या या सलामीवीराने डावाची सुरुवात करताना खंबीर खेळ केला. एका महिन्याहून अधिक काळानंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धात्मक समान्यात त्याने 85 चेंडूत उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. अमन मोखाडे आणि कर्णधार देवदत्त पडिक्कल (जो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन अर्धशतकांसह प्लेअर ऑफ द सिरीज ठरला होता) लवकर बाद झ् झाल्यानंतर या डावखुऱ्या फलंदाजाने शेख रशीदसोबत तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागिदारी केली आणि संघाची धावसंख्या 2 बाद 78 पर्यंत नेली.

मात्र सुदर्शनला या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आले नाही. फिरकीपटू रोचिचिओलीच्या गोलंदाजीवर फ्लिक करण्याचा प्रयत्न करताना त्याने गोलंदाजाकडेच सोपा झेल दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीरशीद आणि यश राठोड यांना झटपट बाद केले. ज्यामुळे इंडिया ए ची अवस्था 5 बाद 97 अशी झाली. मात्र त्यानंतर सहाव्यह विकेटसाठीच्या जोडीने संघाला सावरले.

थोडक्यात धावफलक: इंsिडया ए 89 षटकांत 5 बाद 257 (साई सुदर्शन 57, कुमार कुशाग्रह 82(दुखापतीमुळे निवृत्त), तनुष कोटियन 68 खेळत आहे, कोरी रोचिचिओली 3-72)

Advertisement
Tags :

.