सुदर्शन, जुरेलकडून एका पॅडने फिरकी गोलंदाजांचा सामना
वृत्तसंस्था/कोलकाता
भारताच्या साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी जाळ्यातील सराव सत्रादरम्यान फक्त एक पॅड घालून फिरकी गोलंदाजांचा सामना केला. बहुतेक अपारंपरिक पद्धतींप्रमाणे ईडन गार्डन्स येथे झालेल्या या जवळजवळ तीन तासांच्या ऐच्छिक सत्रादरम्यान पाहायला मिळालेल्या या पद्धतीत जोखमीचा घटक होता. डावखुरा फलंदाज सुदर्शनसाठी त्याचा उजवा पॅड काढून टाकण्याच्या निर्णयाचा अर्थ त्या पायावर कोणत्याही संरक्षणाशिवाय फ्रंट फूटवर येऊन खेळणे असा होता. सुदर्शन ईडन गार्डन्सवरील कसोटी खेळला नाही आणि गुवाहाटीत त्याला स्थान मिळेल याची खात्री नाही. डावखुरे फिरकीपटू आणि ऑफस्पिनर्सविऊद्ध फ्रंट पॅडशिवाय फलंदाजी करताना त्याला हाडावर किंवा फ्रॅक्चर होऊ शकण्राया कोणत्याही उघड्या भागावर चेंडू बसणे टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. ही एक जुनी प्रशिक्षण पद्धत आहे, जिथे प्रशिक्षक चेंडू रोखण्यासाठी फलंदाजांना त्यांच्या फ्रंट पॅडपेक्षा बॅटचा जास्त वापर करण्याचा आग्रह करतात. पॅड घातल्याने फ्रंट पॅड संरक्षणाच्या पहिल्या रांगेत येते आणि बहुतेकदा ते फ्रंट-फूट लेग-बिफोर स्थितीत जातात. नेटमध्ये फ्रंट पॅड काढून टाकल्याने फलंदाजाला बॅटवर अवलंबून राहावे लागते.
या सरावामागील आणखी एक कारण म्हणजे डावखुऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सध्या बॅकफूटवर जाण्याची प्रवृत्ती आहे, कारण त्यांना फिरकीपटू चेंडू हातातून सोडताना ओळखणे कठीण जाते आणि चेंडू वळतो तसा ते खेळण्याचा प्रयत्न करतात. असा सराव फलंदाजांना क्रीजमधून बाहेर पडण्यास आणि फिरकी गोलंदाजाने टाकलेला चेंडू दाबण्यास प्रोत्साहित करतो. त्याचप्रमाणे, जुरेलला त्याच्या उजव्या पॅडशिवाय खेळताना पाहिले गेले. कारण तो मधल्या खेळपट्ट्यांपैकी एकावर रिव्हर्स स्वीप हाणण्याचा सराव करत होता. उजव्या हाताच्या फलंदाजाला अशा फटक्याची अंमलबजावणी करण्यासाठी उजवा पाय खूप पुढे टाकावा लागतो. हा सराव योग्य हालचाल सुनिश्चित करण्यासाठी आणि दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी आखला होता.
ऐच्छिक सत्रादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शुभमन गिलची जागा घेण्याच्या बाबतीत उपलब्ध दावेदारांपैकी एक असलेल्या सुदर्शनवर बारकाईने लक्ष ठेवले. गिलला मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावे लागू शकते. हा तऊण फलंदाज वेगवान गोलंदाजांविऊद्ध पूर्ण आत्मविश्वासाने खेळताना दिसला नाही. कारण आकाश दीपचे चेंडू अनेक वेळा त्याच्या बॅटच्या बाह्य कडेला लागून गेले आणि जाळ्यात सरावासाठी आणलेल्या अन्य गोलंदाजांनीही त्याला त्रास दिला गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी अनेक ब्रेकदरम्यान त्याच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. ऐच्छिक सत्रासाठी फक्त सहा खेळाडूच हजर राहिले हे थोडे आश्चर्यकारक होते, यामध्ये सर्वांत वरिष्ठ सदस्य रवींद्र जडेजा याचा समावेश होता, ज्याने सर्वांत जास्त काळ फलंदाजी केली.
नितीश रेड्डीची हजेरी
दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलचा सहभाग असण्याची शक्यता खूपच कमी असल्याने राजकोटमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’विरुद्धच्या मालिकेसाठीच्या भारत ‘अ संघातून अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी याला बाहेर काढण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, मानेला त्रास जाणवत असला, तरी गिल संघासोबत गुवाहाटीला जाणार आहे. दुसरी कसोटी तो खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे. जर गिल गुवाहाटीला पोहोचू शकला नाही, तर तो कोलकाताहून बेंगळूर येथील बीसीसीआय सीओई येथे जाईल, कारण उड्डाण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. रेड्डीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ‘अ’ संघाचा तिसरा व शेवटचा सामना बुधवारी होणार आहे. परंतु आंध्र प्रदेशचा हा अष्टपैलू खेळाडू सोमवारी संध्याकाळी कोलकाताला पोहोचला. मात्र त्याने दिवसाच्या जाळ्यातील सराव सत्रात भाग घेतला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रेड्डीला बुधवारी रात्री राजकोटमध्ये खेळणे व नंतर दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला कनेक्टिंग फ्लाइटने जाणे कठीण झाले असते. याचा अर्थ पहिले सराव सत्र देखील चुकले असते. संघ व्यवस्थापन त्याच्या विरोधात होते. रेड्डीच्या नावावर कसोटी शतक असल्याने आणि तो चांगला फलंदाज असल्याने गुवाहाटीतील अंतिम संघात स्थान मिळविण्यासाठीच्या शर्यतीत असेल.