सुची सेमीकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प सुरु
100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक : पीएलआयचा आग्रह नाही
सुरत :
गुजरातमधील कंपनी सूची सेमीकॉन यांनी देशामध्ये सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली आहे. आगामी काळामध्ये या उद्योगाकरिता 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.
सदरची वरील गुंतवणूक पुढील तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. महत्त्वाची बाब ही की, केंद्राच्या पीएलआय सवलतीच्या योजनेचा लाभ कंपनी घेणार नाही आहे अशी माहिती मिळते आहे.
सवलतीसाठी थांबलो नाही : मेहता
सूची समूहाचे चेअरमन अशोक मेहता यांनी केंद्राच्या सवलतीच्या योजनेकरिता आपण अर्ज केलेला असला तरी आम्ही आमच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. देशात सेमीकंडक्टर निर्मिती प्रक्रियेला बळ देण्यासाठीच आम्हीही या व्यवसायात उतरलो आहोत. आम्ही आमच्या व्यवसायाचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असून त्याप्रमाणे कार्यप्रणालीला सुरुवात करत आहोत. या अनुषंगानेच 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने करत व्यवसाय वाढीवर भर दिला जाणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. पीएलआय सवलतीवर आम्ही अवलंबून नाही आहोत असे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.