For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jitendra Awhad on Sanjay Dina Patil | "ते माझे मित्र आहेत, पण..." संजय दिना पाटलांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडे हे काय म्हणाले..

03:39 PM Jun 25, 2026 IST | NEETA POTDAR
jitendra awhad on sanjay dina patil    ते माझे मित्र आहेत  पण     संजय दिना पाटलांच्या  त्या  वादग्रस्त वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडे हे काय म्हणाले
Advertisement

मुंबई : नुकतेच शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारांशी वादग्रस्त पद्धतीने संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.काही दिवसांपूर्वी विरोधकांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांच्या त्या विधानावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पोलीस आयुक्तांकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती.

Advertisement

यावर पत्रकांरांनी त्याना प्रश्न विचारले असता, संजय दिना पाटील हे संतापल्याचे दिसून आले. प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पत्रकारांशी उग्र भाषेत संवाद साधला.यावर राज्यातुन अनेक तीव्र प्रतिक्रीय व्यक्त होत आहे.. आता संजय दिना पाटील याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.....

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

Advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला संजय पाटील यांचा स्वभाव चांगला माहिती आहे. ते माझे मित्र आहेत. मात्र त्यांनी जे वक्तव्य केले, ते चुकीचे होते, हेही मी स्पष्टपणे सांगतो. तरीही संजय पाटील हे गुंड प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व नाहीत.”

पुढे बोलताना आव्हाड यांनी, “कदाचित ते भावनेच्या भरात बोलले असतील. पण बॉम्ब टाकेन, मारून टाकेन अशा प्रकारची भाषा वापरण्याचा काळ आता राहिलेला नाही,” असे मत व्यक्त केले.

तसेच त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने सल्ला देताना सांगितले की, “अशी वक्तव्ये राजकीय कारकीर्दीवर परिणाम करू शकतात. हीच वाक्ये एखाद्या नेत्याचे राजकारण संपवू शकतात, एवढेच मला सांगायचे आहे.” अशी प्रतिक्रीया देत त्यांनी संजय दिना पाटील यांच्या वाद ग्रस्त वक्तव्यावर सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला ...पुढे बोलताना आव्हाड यांनी, “कदाचित ते भावनेच्या भरात बोलले असतील. पण बॉम्ब टाकेन, मारून टाकेन अशा प्रकारची भाषा वापरण्याचा काळ आता राहिलेला नाही,” असे मत व्यक्त केले.

दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादात आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.