महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

असे हे मतदारसंघ

06:46 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

या लोकसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होत आहे. या टप्प्यात 102 मतदारसंघ असून, त्यांच्यापैकी काहींची ही संक्षिप्त ओळख...

Advertisement

 

Advertisement

तामिळनाडू

  1. कन्याकुमारी मतदारसंघ (मतदारसंख्या 19 लाख 64 हजार)

? तामिळनाडूच्या अगदी दक्षिण टोकाला असलेला हा मतदारसंघ भारताचेही दक्षिण टोक म्हणून ओळखला जातो. 1960-1970 या काळात येथे संघ परिवाराच्या संस्थेने एकनाथजी रानडे यांच्या पुढाकाराने स्वामी विवेकानंदांचे स्मारक सागरातील एका खडकावर तेथील सत्ताधारी द्रमुकचा प्रचंड विरोध असतानाही निर्माण केले. तेव्हापासून संपूर्ण भारतातून तेथे पर्यटकांची गर्दी होत असते.

? या मतदारसंघातून 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकदाच यश मिळाले होते. 2009 पासून येथे दोनदा द्रमुक तर दोनदा काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसने येथे 2021 मध्ये पोटनिवडणूक जिंकली होती. येथे हिंदू मतदार बहुसंख्य असले तरी ख्रिश्चन धर्मियही लक्षणीय संख्येने आहेत.

 

  1. कोईंबतूर मतदारसंघ (मतदारसंख्या 20 लाख 24 हजार)

? तामिळनाडूच्या पश्चिम भागात असलेला हा मतदारसंघ मुख्यत: शहरी आहे. हे शहर तामिळनाडूतील चेन्नईनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य शहर आहे. या शहरातील वस्त्रोद्योग आणि इतर उद्योग प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूला जागतिक औद्योगिक नकाशावर स्थान मिळवून देण्यात याचे योगदान महत्वाचे आहे.

? प्रामुख्याने डाव्या पक्षांचे वर्चस्व आहे. मात्र, भारतीय जनता पक्षासह अन्य पक्षांनीही मतदारांनी प्रतिनिधित्व दिलेले आहे. डाव्या पक्षांनी 6 वेळा, काँग्रेसने दोनदा, द्रमुकने दोनदा तर भारतीय जनता पक्षाने दोनदा विजय मिळविलेला आहे. 1998 मध्ये दहशतवादी बाँबस्फोट मालिकेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

 

  1. चेन्नई उत्तर मतदारसंघ (मतदारसंख्या 15 लाख 19 हजार)

? तामिळनाडूच्या राजधानीचे शहर असणाऱ्या चेन्नईचा उत्तरभाग म्हणजे हा मतदारसंघ आहे. हा पूर्णत: शहरी असून तेथे तामिळींसमवेत देशाच्या अन्य भागातून आलेले नागरिकही वास्तव्य करतात. अनेक मोठ्या उद्योगांची कार्यालये तसेच उत्पादन केंद्रे येथे आहेत. माहिती तंत्रज्ञान उद्योगही मोठ्या प्रमाणात आहे.

? 1957 मध्ये येथे प्रथम लोकसभा निवडणूक झाली. तेव्हापासून द्रमुकचे वर्चस्व आहे. या पक्षाने येथे दहावेळा विजय मिळवलेला असून काँग्रेसला एकदा तर अण्णाद्रमुकला एकदा यश मिळाले आहे. हा मतदारसंघ द्रमुकचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याची निर्मिती 1954 मध्ये करण्यात आली होती.

 

  1. रामनाथपुरम मतदारसंघ  (मतदारसंख्या 16 लाख 61 हजार)

? तामिळनाडूच्या पूर्वसागरतटावर असणारा हा मतदारसंघ आहे. 1990 च्या दशकात येथे मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या सामुहिक धर्मांतराचे प्रकरण घडले होते. या घटनेपासून हा भाग भारतात सर्वत्र चर्चेचा विषय झाला. हा शहर आणि ग्रामीण असा मिश्र मतदारसंघ असून या भागाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे.

? 1952 मध्ये येथे प्रथम लोकसभा निवडणूक झाली होती. तेव्हापासून सहा वेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. अण्णाद्रमुकने 3 वेळा येथे प्रतिनिधित्व केले. त्या तुलनेत येथे द्रमुकला विशेष यश मिळालेले नाही. तामिळ मनिला काँग्रेसनेही येथे एकदा विजय प्राप्त केला असून द्रमुकने दोनदा निवडणूक जिंकली आहे.

 

  1. श्रीपेरांबुदूर मतदारसंघ (मतदारसंख्या 23 लाख 14 हजार)

? तामिळनाडूच्या उत्तर टोकाला हा मतदारसंघ असून त्याचे 1971 आणि 2004 असे दोन वेळा परिसीमन करण्यात आलेले आहे. हा प्रामुख्याने शहरी मतदारसंघ आहे. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर श्रीपेरांबुदूर हे नाव जगभराच्या चर्चेचा विषय बनले होते. 1962 पासून याचे अस्तित्व आहे.

? या मतदारसंघावर नेहमीच द्रमुकचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात युती झाल्यानंतर काहीवेळा हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ एकदाच येथे अण्णाद्रमुकचा उमेदवार विजयी झाला असून इतर वेळा कायम द्रमुक किंवा काँग्रेसचेच वर्चस्व येथे राहिलेले दिसून येते.

 

  1. कांचीपुरम मतदारसंघ  (मतदारसंख्या 17 लाख 43 हजार)

? या मतदारसंघाची निर्मिती 2008 च्या परिसीमनानंतर करण्यात आली आहे. तथापि, 1952 मध्ये मात्र या मतदारसंघाचे अस्तित्व होते. नंतर तो अन्य मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आला होता. या भागाला प्राचीन इतिहास असून ते पुरातन काळी घटिकास्थानम या नावाने शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.

? या मतदारसंघात कोणत्याच पक्षाचे एकहाती वर्चस्व नाही. 1952 मध्ये येथे ‘कॉमनवेल्थ पार्टी’ नावाच्या पक्षाचा विजय झाला होता. हा पक्ष आता अस्तित्वात नाही. त्यानंतर 2009 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकदा द्रमुक आणि दोनदा अण्णाद्रमुक अशा पक्षांचा विजय झाला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article