For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असाही प्रामाणिकपणा !

05:56 PM Aug 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
असाही प्रामाणिकपणा
Advertisement

गुरुदास कुणकेरकर यांना वाटेत सापडलेली पैशाची पिशवी केली परत

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री मणेरीकर बसने सावंतवाडीत आले असता त्यांचे बस स्टॅन्ड नजीक रस्त्यावर पंच द्रविड पतसंस्थेच्या पासबुकसह पैसे असलेली पिशवी गहाळ झाले. दरम्यान कुणकेरी येथील गुरुदास कुणकेरकर यांना या पतसंस्थेच्या पासबुकसह पैसे असलेली पिशवी सापडली.यावेळी गुरुदास कुणकेरकर यांनी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना सोबत घेत या पतसंस्थेमध्ये गेले असता श्री मणेरीकर पासबुकसह पैसे गहाळ झाल्यामुळे हताश होऊन बसले होते. यावेळी चौकशी अंतिम ते पासबुक आणि पैसे श्री मणेरीकर यांना दिल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे गुरुदास कुणकेरकर यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.