For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अशीही गोमाता भक्ती

06:36 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अशीही गोमाता भक्ती
Advertisement

हिंदूंच्या दृष्टीने गोमाता किंवा गाय ही देवता आहे. गाईच्या भक्तीला आपल्या संस्कृतीत मोठे महत्व आहे. शुभप्रसंगी गोमातेची पूजा केली जाते. घरात गाय पाळलेली असेल, तर तिला घरच्या सदस्याप्रमाणे सन्मान दिला जातो. राजस्थान राज्यातील एका गाईची ही कहाणी आहे. या गाईसाठी 24 लाख रुपये किमतीची आभूषणे बनविण्यात आली आहेत. तसेच तिच्या निवासासाठी दोन मजली वास्तूचे निर्माणकार्य करण्यात येत आहे. ही गाय कोणत्याही धार्मिक संस्थेची किंवा देवस्थानाची नाही. तर ती जालोर येथील एक उद्योजग नरेंद्र पुरोहित यांची आहे. ते तिला आपल्या घरातील सदस्य मानून तिचे पालनपोषण करतात. या गाईचे नामकरण त्यांनी मायेने ‘राधा’ असे केलेले आहे. ही गाय घरात आणल्यानंतर त्यांनी वैभव प्राप्त झाले, अशी त्यांची भावना आहे. या गाईची व्यवस्था थाटामाटात केली जाते. एक कोटी रुपये खर्च करुन तिच्यासाठी स्वतंत्र वास्तू निर्माण करण्यात येत असून, या वास्तूचा एक मजला केवळ तिच्या वास्तव्यासाठीच बनविला आहे.

Advertisement

नरेंद्र पुरोहित यांचा परिवार या गाईची व्यवस्था आपुलकीने करतो. या गाईची प्रतिदिन सकाळी यथासांग पूजा केली जाते. तिच्या आहाराची व्यवस्था ही विशेष आहे. तिच्यासाठी पक्वान्ने केली जातात. तिचे आरोग्य सांभाळण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे योगक्षेम ज्याप्रमाणे पाहिले जाते, त्याचप्रमाणे पुरोहित यांचा परिवार गाईचे योगक्षेम पाहतो. पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय आहे.

या गाईवर इतकी भक्ती का, याचे उत्तर नरेंद्र पुरोहित यांनी दिले आहे. एकेकाळी ते केवळ 1 हजार 500 रुपये वेतनावर नेकरी करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतंत्र व्यवसायाचा प्रारंभ केला. त्याचवेळी ही गाय त्यांनी घरात आणली. काही वर्षांमध्येच त्यांचा व्यवसाय फळफळला. त्यांनी रेल्वेच्या कामांचे ठेके घेणाऱ्या बांधकाम कंपनीचा शुभारंभ केला. आज ते राजस्थानातील रेल्वेचे मोठे कंत्राटदार मानले जातात. ही गाय घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली. त्यामुळे व्यवसायाला वैभव प्राप्त झाले. परिणामी, ही गाय त्यांचे महत्वाचे श्रद्धास्थान बनली आहे. तिच्या योगक्षेमाची व्यवस्था करणे, हे आपले परमकर्तव्य आहे असे मानतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.