For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असे मतदारसंघ, असे उमेदवार

06:16 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
असे मतदारसंघ  असे उमेदवार
Advertisement

तिसऱ्या टप्प्याचे मतदान येत्या मंगळवारी, अर्थात 7 मे या दिवशी होत आहे. एकंदर 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 94 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत असून, या मतदारसंघांमधील अनेक महत्वाचे आहेत. तेथील उमेदवारही तोलदार आहेत. या टप्प्यातील काही मतदारसंघांचा हा आढावा...

Advertisement

  1. विदिशा : मध्यप्रदेशातील हा मतदारसंघ पूर्वीपासून जनसंघाचा आणि नंतर भारतीय जनता पक्षाचा गढ मानला जातो. येथे या निवडणुकीत या पक्षाने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी उमेदवारी दिली आहे. शिवराजसिंग चौहान यांना केंद्रामध्ये महत्वाची उत्तरदायित्व देण्याची भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची आहे. 1967 मध्ये हा मतदारसंघ अस्त्वात आला. तेव्हापासून 13 वेळा येथून जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला दोनवेळा ही जागा मिळालेली आहे. 2019 मध्ये येथून रमाकांत भार्गव विजयी झाले होते. चौहान यांच्यासाठी स्पर्धा सोपी मानली जाते.
  2. गुणा : मध्यप्रदेशातील या मतदारसंघातून नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर सिंदिया येथून चारवेळा विजयी झाले आहेत. त्यांचे पिता दिवंगत माधवराव सिंदियाही येथून तीनदा विजयी झाले होते. 1952 मध्ये येथून हिंदू महासभेचे उमेदवार डी. व्ही. देशपांडे विजयी झाले होते तर ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या आजी राजमाता विजयाराजे सिंदिया दोन वेळा काँग्रेसकडून तर एकदा स्वतंत्र पक्षाकडून विजयी झाल्या होत्या. सिंदिया कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही पक्षात असला तरी तो या मतदारसंघातून निवडून येतो, अशी याची मान्यता आहे.
  3. राजगढ : मध्यप्रदेशातील या मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग उमेदवार आहेत. ते प्रथम येथून लढण्यास इच्छुक नव्हते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना मैदानात उतरवले आहे, असे बोलले जाते. प्रारंभीच्या काळात हा मतदारसंघ काँग्रेसचा गढ होता. 1952 पासून आतापर्यंत काँग्रेसने तो 10 वेळा जिंकला आहे. तर भारतीय जनता पक्षाला येथून 6 वेळा यश मिळाले आहे. 2014 आणि 2019 मध्ये येथे रोडमल नागर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. यावेळी या पक्षाने त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंग यांना कडवी लढत द्यावी लागणार अशी चिन्हे आहेत.
Advertisement
Tags :

.