महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राहुल द्रविडचा असाही अनोखा अंदाज

06:51 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पत्नी विजेतासोबत पायऱ्यांवर बसून पाहिला लेकाचा सामना : सोशल मीडियावर फोटो जोरदार व्हायरल

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यात राहुल द्रविडच्या नावाचाही समावेश होतो. द्रविडने त्याच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. एक क्रिकेटपटूसोबतच द्रविडने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. सध्या द्रविड कुटुंबासोबत वेळ घालवत असताना अशातच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत तो पत्नी विजेतासोबत पायऱ्यांवर बसून लेकाचा सामना पाहत आहे.

टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड आणि त्याची पत्नी विजेता यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो अंडर 19 कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेतील आहे. राहुल आणि विजेता हे वाडेयर क्रिकेट मैदानावर मुलगा समितला खेळताना पाहण्यासाठी पोहोचले होते. यावेळी या दोघांनी काही काळ पायऱ्यांवर बसत कर्नाटक व उत्तराखंड यांच्यातील सामना पाहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत उत्तराखंडने 9 गड्यांच्या मोबदल्यात 232 धावा केल्या होत्या. या सामन्यात राहुल द्रविडचा मुलगा समितने 5 षटके टाकली. यामध्ये त्याने 2 मेडन टाकली आणि 11 धावा खर्च केल्या. मात्र त्याला विकेट मिळाली नाही. समित मुख्यत: फलंदाज आहे. मागील सामन्यात त्याने हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळताना अर्धशतक केले होते. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी फारसे चाहते नव्हते. मात्र उपस्थित असलेल्या एकाने या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. चाहत्यांनी या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article