For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असाही एक न्यायाधीश

06:46 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
असाही एक न्यायाधीश
Advertisement

आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान हा देश बऱ्याच बाबतींमध्ये दिवाळखोर बनला आहे. आर्थिक बाबतीत तर तो भिकेला लागला आहे, असे बोलले जाते.  या देशात काहीही (वाईट) घडू शकते, असेही त्याचे वर्णन केले जाते. याच देशातील एक अद्भूत घटना आता समोर आली आहे. या देशाची राजधानी इस्लामाबाद येथील उच्च न्यायालयात एका ‘बनावट’ न्यायाधीशाने पाच वर्षे काम केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या न्यायाधीशाजवळ कोणतीही कायद्याची वैध पदवी नव्हती. त्याने बनावट पदवीच्या आधारे वकीलीला प्रारंभ केला होता. नंतर तो याच नकली पदवीच्या आधारे न्यायाधीश झाला आणि त्याला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पदोन्नतीही मिळाली. उच्च न्यायालयात त्याने तब्बल पाच वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. कोणाला शंकाही आली नाही.

Advertisement

नंतर काही कारणामुळे त्याच्या पदवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे वकीलीची बनावट पदवी असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव तारीक महम्मूद जहांगिरी असे आहे. या व्यक्तीचा इतिहासही मनोरंजक आहे. 1988 मध्ये त्याला बनावट आसन क्रमांकावर परीक्षा देताना पकडण्यात आले होते. 1989 मध्ये त्याच्यावर कराची विद्यापीठाने बंदी घातली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर त्याने बनावट नावाने परीक्षा दिली. 2020 मध्ये तो बनावट पदवीच्या साहाय्याने इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनला. त्याने पाच वर्षे काम केले. तथापि, नंतर त्याच्या विरोधात तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्याच्या पदवी प्रमाणपत्राची तपासणी केली गेली.  यावेळी त्याची पदवी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर कारवाई होत आहे. तथापि, त्याने दिलेल्या निर्णयांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.