एसएफडीआर तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण
डीआरडीओची मोठी कामगिरी : भारताच्या क्षेपणास्त्रांना मिळणार नवी शक्ती
वृत्तसंस्था/ चांदीपूर
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) मंगळवारी ओडिशाच्या किनाऱ्यानजीक चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमधून सॉलिड फ्यूल डक्टेड रामजेट (एसएफडीआर) तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले आहे. या यशस्वी परीक्षणासोबत भारत प्रगत तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे.
हे तंत्रज्ञान दीर्घ पल्ल्याच्या आकाशातून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या तंत्रज्ञानामुळे संभाव्य विरोधकांच्या तुलनेत रणनीतिक आघाडी प्राप्त होते. परीक्षणादरम्यान सर्व प्रमुख उपप्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे. यात नोजल-लेस बूस्टर, सॉलिड फ्यूल डक्टेड रामजेट मोटर आणि फ्यूल फ्लोर कंट्रोलर सामील होते.
सिस्टीमला प्रथम ग्राउंड बूस्टर मोटरच्या मदतीने निर्धारित मॅक संख्येपर्यंत पोहोचविण्यात आले, ज्यानंतर एसएफडीआर प्रणालीने यशस्वीपणे काम केले आहे. पूर्ण परीक्षणावर देखरेख आणि पुष्टी आयटीआर चांदीपूरकडून बंगालच्या उपसागरात तैनात अनेक ट्रॅकिंग उपकरणांद्वारे प्राप्त डाटाद्वारे करण्यात आली.
प्रक्षेपणादरम्यान डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा ज्यात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लेबोरेट्री, हाय एनर्जी मटीरियल्स रिसर्च लेबोरेट्री, रिसर्च सेंटर इमारत आणि आयटीआरचे वरिष्ठ वैज्ञानिक उपस्थित राहिले.
संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
एसएफडीआर तंत्रज्ञानाच्या यशस्वी परीक्षणावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. तर डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या यशस्वी उ•ाण परीक्षणात सामील सर्व टीम्सचे अभिनंदन केले आहे.
एसएफडीआर तंत्रज्ञानाची वैशिष्ट्यो....
- हे तंत्रज्ञान दीर्घ पल्ल्याच्या एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांच्या विकासात सक्षम करते.
- पारंपरिक प्रणालींच्या तुलनेत उ•ाणादरम्यान अधिक थ्रस्ट प्रदान करते.
- नोजल-लेस बूस्टर आणि डक्टेड रामजेट मोटरचे संयोजन उच्चगतीवर प्रभावी कामगिरी सुनिश्चित करते.
- फ्यूल फ्लो कंट्रोलरद्वारे इंधन पुरवठ्याला नियंत्रित केले जाते, ज्यामुळे दक्षता वाढते.
- आधुनिक हवाई युद्धांच्या स्थितीत सामरिक आघाडी मिळवून देण्यास सहाय्यभूत.