देशात 5-जी कॉलचे यशस्वी परीक्षण
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती : देशातच 5-जी टेस्टबेड विकसित
वृत्तसंस्था / चेन्नई
आयआयटी मद्रासमध्ये 5-जी कॉलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. नेटवर्कचे सर्व डिझाईन भारतातच विकसित करण्यात आले आहे. 5-जी टेस्ट बेडला एकूण 8 संस्थांनी मिळून विकसित केले आहे. हा तंत्रज्ञान विकास आयआयटी मद्रासच्या नेतृत्वात करण्यात आला आहे.
या प्रकल्पात आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी पवई, आयआयटी कानपूर, आयआयएससी बेंगळूर, सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग अँड रिसर्च आणि सेंटर ऑफ ऍक्सिलेन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी सामील आहे.
हा प्रकल्प विकसित करण्यासाठी 220 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला असल्याचे माहिती सरकारकडून अलीकडेच देण्यात आली होती. टेस्टबेड इंडियन इंडस्ट्री आणि स्टार्टअपसाठी हा प्रकल्प सपोर्टिव्ह इकोसिस्टीमला सक्षम करणार आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 5-जी तंत्रज्ञान तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयाकडून देण्यात आली होती. देशातच 5-जी टेस्टबेड विकसित केल्याने भारताचे याच्याशी संबंधित तंत्रज्ञानप्रकरणी अन्य देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.