For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपरकिलर ‘रुद्रम 2’चे यशस्वी परीक्षण

06:16 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुपरकिलर ‘रुद्रम 2’चे यशस्वी परीक्षण
Advertisement

हायपरसोनिक वेग : डीआरडीओकडून क्षेपणास्त्र विकसित

Advertisement

वृत्तसंस्था/ चांदीपूर

भारताने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानात आणखी एक ऐतिहासिक यश मिळविले आहे. डीआरडीओ तसेच भारतीय वायुदलाच्या संयुक्त टीमने आकाशातून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र ‘रुद्रम-2’चे यशस्वी उ•ाण परीक्षण पूर्ण केले आहे. ओडिशाच्या चांदीपूर येथील एकीकृत परीक्षण रेंजमध्ये हवाई प्लॅटफॉर्मवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही पूर्ण अचूकतेसह स्वत:च्या पूर्व निर्धारित लक्ष्याचा भेद केला आहे. उ•ाण डाटा आणि रेंज ट्रॅकिंग सिस्टीमकडून प्राप्त माहितीच्या आधारावर क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींनी अचूक कामगिरी केल्याची पुष्टी मिळाली आहे.

Advertisement

रुद्रम-2 क्षेपणास्त्र हैदराबाद येथील डीआरडीओच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहे. उच्च ऊर्जासामग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल), शस्त्र संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एआरडीई) आणि आयटीआर समवेत डीआरडीओच्या अनेक अन्य प्रयोगशाळांनी यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अत्यंत शक्तिशाली

हे क्षेपणास्त्र 300 किलोमीटरचा मारक पल्ला असलेले हायपरसोनिक एअरो-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे सांगण्यात येत आहे. यात अत्याधुनिक इमेजिंग इन्फ्रारेड सीकर लावण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूचे रडारस्थानक, संचार केंद्र आणि हवाई सुरक्षा प्रणालींना नष्ट करण्यास सक्षम आहे. जवळपास 200 किलोग्रॅम वजनदार पेलोड याला आणखी घातक स्वरुप देतात. रुद्रम-2 भारतीय वायुलाच्या एसईएडी (सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्सेस) क्षमतेला अभूतपूर्व उंची प्रदान करतील असे तज्ञांचे मानणे आहे.

अनेक प्लॅटफॉर्मवर तैनात

संरक्षण मंत्रालयाच्या योजनेच्या अंतर्गत रुद्रम-2 क्षेपणास्त्र तेजस लढाऊ विमान,  आगामी एएमसीए आणि टीईडीबीएफ समवेत भारताच्या आधुनिक लढाऊ विमानांवर एकीकृत करण्यात येणार आहे. तसेच मिग-29, मिराज-2000, जग्वार आणि सुखोई-30 एमकेआर यासारख्या वर्तमानात सेवेत असलेल्या लढाऊ विमानांमध्येही ते जोडले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.