गणपतीपुळेत उद्या पहाटे साडेतीनपासून दर्शन सोहळा ! गणपतीपुळे यात्रेनिमित्त जय्यत तयारी
तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २५ जुन रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त होणाऱ्या यात्रे निमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायत तसेच गणपतीपुळे पोलीस ठाणे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्याकडून मोठी तयारी करण्यात येत असून तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे गावामध्ये सुमारे एक वर्षापासून पहिलीच अंगारकी चतुर्थी भरत असल्याने गणपतीपुळे व परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक २५ जून रोजी अंगारकी चतुर्थी असल्याकारणाने मोठी गर्दी होणार असल्याकारणाने संस्था श्री देव गणपतीपुळे ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.गणपतीपुळे देवबाग या ठिकाणी पत्र्याचा मांडव बांधून व्यवस्था करण्यात आली आहे.पावसाचा अंदाज असल्यामुळे दर्शन लाईन पत्रे टाकून पावसापासून संरक्षण करण्यात आले आहे. तसेच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बाहेरगावची दुकाने आली असून त्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी मांडली असल्याचे दिसून येत आहेत. एकंदरीतच होणारी गर्दी पाहता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि रत्नागिरीतून मागवलेले पोलीस कर्मचारी संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवून राहणार आहेत तसेच चौका चौकात ग्रामपंचायत व संस्थान गणपतीपुळे यांनी लाईटची व्यवस्था केली आहे. येणाऱ्या भाविकांच्या फोर व्हीलर व मोठ्या गाड्या सागर दर्शन पार्किंगला व्यवस्था करण्यात आली आहे.