महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

के-सीईटी परीक्षेची जय्यत तयारी

10:35 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव, बैलहोंगल , चिकोडीत परीक्षा केंद्रे : जिल्ह्यात 17,963  परीक्षार्थी

Advertisement

बेळगाव : के-सीईटी परीक्षा 18 ते 20 एप्रिल दरम्यान होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 17,963 विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार आहेत. 8,757 बेळगाव तर 9,206 चिकोडी विभागातून परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी पूर्वतयारी करण्यात आली असून पर्यवेक्षक, निरीक्षक यासह इतर अधिकारी नेमण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, पॅरामेडिकल यासह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी के-सीईटी परीक्षा द्यावी लागते. 18 व 19 रोजी मुख्य परीक्षा होणार असून 20 रोजी इतर राज्यातील कर्नाटकात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्नड विषयाचा पेपर घेतला जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 21 परीक्षा केंद्रांवर सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी 17 परीक्षा केंद्रे बेळगाव शहरात तर 4 परीक्षा केंद्रे बैलहोंगल येथे आहेत. चिकोडी येथे 25 परीक्षा केंद्रांवर सीईटी होणार आहे. शेजारील महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनेक विद्यार्थी बेळगाव येथे उच्चशिक्षणासाठी के-सीईटी परीक्षा देतात. बेळगावमध्ये 504 विद्यार्थी कन्नड विषयाचा पेपर देणार आहेत. बारावी परीक्षेप्रमाणेच प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ट्रेझरी कार्यालयापासून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रापर्यंत आणण्यासाठी तीन सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एका निरीक्षकाची नेमणूक केली आहे. याबरोबरच पदवीपूर्व शिक्षण विभागानेही एकेक निरीक्षक नेमले आहेत.

Advertisement

बेळगाव, चिकोडी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आज बैठक

18 ते 20 एप्रिल दरम्यान के-सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन तसेच पदवीपूर्व शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सीईटी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात निरीक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

- एम. एम. कांबळे (पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article