For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अग्निबाण रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
अग्निबाण रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
Advertisement

स्पेस स्टार्टअप ‘अग्निकुल कॉसमॉस’कडून उड्डाण : भारतीय अंतराळ मोहिमेसाठी ऐतिहासिक क्षण

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीहरिकोटा

भारतीय अंतराळ मोहिमेसाठी गुऊवार हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. चेन्नईस्थित स्पेस स्टार्ट-अप ‘अग्निकुल कॉसमॉस’ने श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळावरून स्वत: निर्मित 3-डी प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक रॉकेट ‘अग्निबाण’ची यशस्वी चाचणी घेतली. असे उड्डाण करणारी ती भारतातील दुसरी खासगी संस्था ठरली. चार अयशस्वी प्रयत्नांनंतर कोणत्याही लाईव्ह-स्ट्रिमिंगशिवाय गुरुवारी हा प्रयोग फत्ते करण्यात आला. यशस्वी उड्डाण नंतर इस्रोने अग्निकुल कॉसमॉसचे अभिनंदन करताना ही एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील श्रीहरिकोटा प्रक्षेपण तळावर फारच कमी लोक उपस्थित होते. अग्निकुल कॉसमॉसने श्रीहरिकोटा येथील धनुष लॉन्चपॅडवरून सकाळी 7.15 वाजता आपल्या पहिल्या सिंगल स्टेज रॉकेटचे उड्डाण केले. अग्निबाण SOrTeD (सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) असे या मोहिमेचे नाव आहे. हे सब-ऑर्बिटल फ्लाइट होते. या नियंत्रित उड्डाणची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. इन-हाउस टेक्नॉलॉजीच्या प्रात्यक्षिकांसह आवश्यक डेटा गोळा करणे हा या अभियानाचा उद्देश होता. यापूर्वी 4 वेळा ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. 22 मार्चपासून अग्निबाण सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर (SOrTeD प्रक्षेपित करण्याचा ‘अग्निकुल’चा हा पाचवा प्रयत्न होता. एखाद्या स्टार्ट-अप कंपनीने केलेली ही मोठी किमया असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर चे प्रमुख पवन गोयंका यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या अवकाश क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. ही कामगिरी आमच्या तऊण नवोदितांची प्रतिभा दर्शवते, असेही ते पुढे म्हणाले. प्रक्षेपित करण्यात आलेले अग्निबाण हे दोन टप्प्यांचे प्रक्षेपण रॉकेट आहे. ते सुमारे 700 किमीच्या कक्षेत 300 किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकते. या रॉकेटमध्ये लिक्विड आणि गॅस प्रोपेलेंट्सच्या मिश्र्रणासह अर्ध-क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान आजपर्यंत इस्रोनेही अद्याप आपल्या कोणत्याही रॉकेटमध्ये वापरलेले नसल्याने या कामगिरीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

पहिले सिंगल-पीस 3डी मुद्रित इंजिन

SOrTeD मिशन हे सिंगल-स्टेज प्रक्षेपण रॉकेट प्रात्यक्षिक आहे. हे अर्ध-क्रायोजेनिक इंजिन इग्निटरद्वारे ऑपरेट केले जाईल. अग्निलेट ही स्वदेशी विकसित सब-कूल्ड लिक्विड ऑक्सिजन-आधारित प्रोपल्शन प्रणाली आहे. स्टार्ट-अपने प्रथमच इथरनेट-आधारित एव्हीओनिक्स आर्किटेक्चर आणि इन-हाउस विकसित ऑटोपायलट सॉफ्टवेअरसह वाहन सुसज्ज केले आहे. अग्निलेट इंजिन हे पहिले सिंगल-पीस 3डी-मुद्रित अर्ध-क्रायोजेनिक रॉकेट इंजिन आहे.

Advertisement
Tags :

.