महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिमोफिलिया रूग्णावर गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

04:53 PM Dec 18, 2024 IST | Radhika Patil
Successful knee transplant surgery on hemophilia patient
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) दुर्मिळ हिमोफिलीया इनहिबिटर ग्रस्त रुग्णावर गुडगा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सीपीआरमधील हिमॅटोलॉजी व अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात हिमोफिलीयाग्रस्त 45 वर्षाच्या रूग्णावर यशस्वी उपचार केले. सीपीआरमधील डॉक्टरांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच शस्त्रकिया यशस्वी करून दाखवली आहे.

Advertisement

सीपीआरमध्ये 45 वर्षीय एक रुग्ण गुडघे दुखीचा तीव्र त्रास होत असल्यामुळे उपचाराकरीता दाखल झाला होता. त्याची तपासणी केली असता जन्मजात गंभीर प्रकारचा हिमोफिलीया म्हणजेच रक्तस्त्राव न थांबण्याचा विकार असल्याचे निदान झाले. रूग्णाला अति वेदना होत असल्याने सीपीआरमधील हिमॅटॉलॉजीस्ट डॉ. वरुण बाफना यांनी तपासणी केल्यानंतर रुग्णाचा डाव्या पायाच्या गुडघा बदलण्याच्या निर्णय केला. (ऊख्R) शस्त्रक्रियेनंतर इनहिविटर (रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणणारा घटक) विकसित झाला होता.
रुग्णाच्या उजव्या गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या व चालणे अशक्य झाले होते. त्यामुळे उजवा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. यासाठी अस्थिव्यंगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. राहूल बडे, सांधे प्रत्यारोपण तज्ञ डॉ. गिरीष मोटे, डॉ. सोहेल जमादार, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आरती घोरपडे यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. नर्सिंग स्टाफ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

                                                     आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी
हिमोफिलिया आणि इनहिबिटर (रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणणारा घटक) असल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात बायपासिंग फॅक्टर, महागडी औषधे व क्लॉटिंग फॅक्टर्सची देखील आवश्यकता होती. शस्त्रकियेनंतर रक्तस्त्राव रोखणे जोखमीचे होते. मात्र, सर्व जोखमी पत्करून विकसित झालेल्या अधुनिक तंत्रज्ञाच्या सहायाने शस्त्रकिया यशस्वी करण्यात आली.

                                                        अशी होती डॉक्टरांची टिम
हिमोफिलीया रूग्णांमध्ये रक्त गोठवण्याची क्षमता कमी असल्यामुळे शस्त्रकिया करताना जोखीम होती. शस्त्रक्रियेमध्ये हिमॅटॉलॉजीस्ट डॉ. वरुण वाफना अस्थिव्यंगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. राहुल बडे, सांधे प्रत्यारोपण तज्ञ डॉ. गिरीष मोटे, डॉ. सोहेल जमादार आणि बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आरती घोरपडे यांनी सर्व आव्हाने असूनही ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर दोन आठवडे मातत्यांने देखरेख ठेवून आवश्यक ते क्लॉटींग फॅक्टर पुरविण्यात आले.

                                                        अन् रूग्णाला डिस्चार्ज
शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचारकरीता औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अनिता परितेकर, डॉ. विद्या पाटील, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. प्रणव गुल्हाने, डॉ. अमृता जाधव तसेच विभागातील डॉक्टरांच्या टिमने अत्यंत कौशल्यपूर्ण नियोजन करुन शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचे उपचार करणेकरीता सहकार्य केले. रुग्णाची तब्येतीमध्ये सुधारणा झाली असून त्याला डिसचार्ज देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article