For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

स्वदेशी ‘मार्क-1ए’ विमानाकडून यशस्वी उड्डाण

03:52 PM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वदेशी ‘मार्क 1ए’ विमानाकडून यशस्वी उड्डाण

आकाशात दिसले भारताचे सामर्थ्य : 15 मिनिटांपर्यंत आकाशात झाले परीक्षण

Advertisement

वृत्तसंस्था /बेंगळूर

देशात निर्मित तेजस लढाऊ विमानाचे अत्याधुनिक स्वरुप मार्क-1ए च्या पहिल्या विमानाची टेस्ट फ्लाइट गुरुवारी यशस्वी ठरली आहे. या सीरिजचे पहिले एअरक्राफ्ट एलए5033 ने बेंगळूरमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड सेंटरमध्ये 15 मिनिटांचे उड्डाण केले आहे. तेजसचे यापूर्वीचे वर्जन वायुदलात सामील झाले आहे. नव्या वर्जनमध्ये एईएसए (अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे) रडार, अॅडव्हान्स्ड बियाँड-व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) मिसाइल आणि हल्ल्यापासून स्वत:ला वाचविण्याची क्षमता आहे. बेंगळूरमध्ये एचएलच्या फिक्स्ड विंग एअरक्राफ्टचे मुख्य टेस्ट पायलट ग्रुप कॅप्टन पे. के. वेणुगोपाल यांनी नव्या वर्जनच्या टेस्ट फ्लाइटमध्ये भाग घेतला. एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेन्सने अॅडव्हान्स्ड वर्जन विकसित केले असून एचएएल याची निर्मिती करत आहे.

Advertisement

एचएलकडून होणार पुरवठा

Advertisement

एचएएलला 2021 मध्ये भारतीय वायुदलासाठी 83 तेजस मार्क-1ए निर्माण करण्यासाठी 46,898 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली होती. कंपनीला मार्च 2024-फेब्रुवारी 2028 पर्यंत 83 विमाने पुरवावी लागणार आहेत.

दरवर्षी 24 लढाऊ विमानांची निर्मिती

यापूर्वी एचएएलला 8,802 कोटी रुपयांच्या करारानुसार 40 तेजस एमके-1 ची ऑर्डर मिळाली होती. यातील 32 सिंगल सीट एलसीए फायटर्स आणि दोन डबल सीट ट्रेनर वायुदलाला सोपविण्यात आले आहे. 6 डबल सीट ट्रेनर कंपनीकडून लवकरच सोपविण्यात येणार आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस लढाऊ विमानातून उ•ाण केले होते. यानंतर लढाऊ विमान प्रकल्पाला बळ मिळाले होते. एचएएलने 2025 पर्यंत दरवर्षी 24 विमाने निर्माण करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

मिग विमानांची जागा घेणार

भारतीय वायुदल तेजसच्या एलसीए वेरियंटद्वारे स्वत:च्या मिग सीरिजच्या विमानांना बदलण्याच्या तयारीत आहे. एलसीए मार्क-1ए विमान मिग-21, मिग-23 आणि मिग-27 चे स्थान घेणार आहे. एलसीए मार्क-1ए चे 65 टक्क्यांपेक्षा अधिक सुटे भाग भारतातच तयार करण्यात आले आहेत. एलसीए मार्क-1ए ला एअरोस्पेसच्या क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भरता आणि मेक-इन-इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.

पाकिस्तानच्या सीमेनजीक होणार तैनात

एचएएल मार्चच्या अखेरपर्यंत वायुदलाला स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट सोपवू शकते. या लढाऊ विमानाला वायुदल पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानच्या बिकानेर येथील नाल वायुतळावर तैनात करणार असल्याचे मानले जात आहे. या विमानामध्ये 2200 किमी प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करण्याची क्षमता आहे. तसेच हे विमान 50 हजार फुटांच्या उंचीपर्यंत झेपावू शकते.

Advertisement
Tags :
×

.