कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृत्रिम झडप बसविण्याची शस्त्रक्रिया 'सीपीआर' मध्ये यशस्वी

11:36 AM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी :

Advertisement

रक्त विकाराच्या गंभीर आजारासह घातक कोरोनरी धमनी असलेल्या 81 वर्षीय वृद्ध रूग्णावर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयामध्ये (सीपीआर) कृत्रीम झडप बसविण्याची हृदय शस्त्रक्रीया यशस्वी करण्यात आली. महाधमनी वाल्व स्टेनोसिस (Aन्घ्) प्रक्रियेनंतर त्याला घरी सोडण्यात आले. सीपीआरचे हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या टिमने आत्तापर्यंत 6 गंभीर रूग्णावर कृत्रीम झडप बसविण्याच्या शस्त्रक्रीया यशस्वी केल्या आहेत.

Advertisement

सदर वृद्धास श्वास घेण्यास त्रास व छातीत दुखू लागले. हृदयरोग तज्ञ डॉ. बाफना यांनी रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीचे धोके टाळण्यासाठी स्टेनोसिससाठी ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक वाल्व इम्प्लांटेशन (Aन्घ्) ही अत्याधुनिक प्रक्रिया निवडली.

उपचारानंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. श्वसनाचा त्रास व छातीत दुखणे देखील कमी झाले आहे. उपचारानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. शस्त्रक्रीया यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, बालरोग विभागाच्या डॉ. संगीता कुंभोजकर, भूलतज्ञ डॉ. राऊत व टीम, डॉ. राज द्विवेदी, डॉ. स्फुर्ती जाधव, रक्तरोगतज्ञ डॉ. वरुण बाफना, डॉ. अजित हांगे, डॉ. आदीब शेख, डॉ. निखिल गाडे, डॉ. कोल्हे, डॉ. पाटील, डॉ. मुल्ला, डॉ. देवरे, कॅथलॅब तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे, वैष्णवी राजेंद्र, मधुरा जावडेकर, रेखा पाटील, सुरेखा गावडे, सायली मानसिंग, प्रिया, एन. कराडे, परवीन अत्तार, शुभांगी जाधव, दीपक गुरव, नर्सिंग स्टाफने सहभाग घेतला.

रुग्णाची स्थिती व वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर त्यांच्या उजव्या कोरोनरी धमनीमध्ये अत्यंत दुर्मिळ व धोकादायक घातक इंटरआर्टेरियल कोर्सची असल्याचे लक्षात आले. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढला होता. रुग्णाच्या हृदयाचा झटका (Aदूग्म् न्न्aत्न) खूप अरुंद होता. अशा स्थितीत रक्तप्रवाह योग्यरित्या राखून रुग्णाच्या महाधमनी व्हॉल्व्हमध्ये कॅथेटरद्वारे यशस्वीरित्या एक नवीन कृत्रिम झडप बसवण्यात आली.

सीपीआरमध्ये अशा गुंतागुंतीच्या आजारावर यशस्वी उचपारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व आधुनिक उपचार पद्धतींचे महत्त्व अधोरेखित होते. ही उपचारपद्धती नवीन जीवनासारखी आहे. यामुळे उच्च जोखीम असलेल्या रुग्णांसाठी नवीन आशा निर्माण झाली आहे.

                                      डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक होती. गंभीर महाधमनी व्हॉल्व्ह स्टेनोसिस, घातक इंटरआर्टेरियल कोर्स व रक्तविकार (एमडीएस, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम) असे आजार होते. हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सची पातळी कमी होती. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जोखमीशिवाय शस्त्रक्रीया यशस्वी करू शकलो.

                                                                                        डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग विभाग प्रमुख, सीपाआर

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article