For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबा घाटातील दरीतील दोन तरुणांचे मृतदेह काढण्यात यश

12:26 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
आंबा घाटातील दरीतील दोन तरुणांचे मृतदेह काढण्यात यश
the valley Amba Ghat
Advertisement

शाहूवाडी प्रतिनिधी

आंबा घाट तालुका शाहूवाडी येथे मठाधिपतीच्या निधनाने वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या सांगली जिह्यांतील मिरज तालुक्यातील कवठेपिरणचे रहिवाशी एकोणीस वर्षीय युवक स्वरूप दिनकर माने व निपाणी येथील सुशांत श्रीरंग सातवेकर या दोघांनी आंबा घाट सड्यावरून उड्या मारून आत्महत्या केली होती.रविवार दुपारी दोघांचे मृतदेह काढण्यात आले. या घटनेची नोंद साखरपा पोलीसांत झाली .

Advertisement

पोलीस व घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, मृत झालेले स्वरूप व सुशांत गेल्या अडीच वर्षा पासून गोरंबे येथील महाराजांच्या मठात राहत होते.एक महिन्या पूर्वी महाराजांचे निधन झाले. महाराजांचे निधन झाल्या पासून ते दोघे ही तणावाखाली वावरत होते . नऊ ऑगष्टला सुशांतने घरी फोन करून सांगितले की मी पावस येथील मठात जात आहे. आंबा घाटातून ते पावस येथे न जाता आंबा घाटातील सड्यावर जाऊन त्यांनी कड्यावरून शंभर फूट खोल दरीत उड्या घेतल्या.शनिवारी वनविभागाचे कर्मचारी जंगल परिसरात फिरत असताना त्यांना हे मृतदेह व मोटार सायकल आढळून आले.

शनिवारी आंबा घाटात जोराचा पाऊस धुके असल्यामुळे मृत देह बाहेर काढण्यास अडथळा येत होता . रविवारी सकाळी राजू काकडे हेल्थ ?केडमीचे आंबा येथील तरुणांनी दोघाचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. मृतदेह काढण्यासाठी राजू काकडे हेल्थ ?केडमीचे सदस्य भाई पाटील ,प्रमोद माळी ,विशाल तळेकर ,अजय भोसले संतोष मुडेकर ,भगवान पाटील दिनेश कांबळे. दिग्विजय गुरव पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील ,किरण शिंदे आदीसह शाहूवाडी , साखरपा पोलीस व वनविभागाच्या कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.