महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वीमर्स, एक्वेरियस क्लबचे सुयश

10:32 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दावणगेरी येथे पीएसएसईएमआर स्कूल आयोजित सीबीएससी साऊथ झोन दुसऱ्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व एक्वेरियस क्लबच्या तीन जलतरणपटूंनी 3 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कास्य एकूण सहा पदकांसह घवघवीत यश संपादन केले आहे.या तिघांची सीबीएससी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक सीबीएससी संघात निवड झाली आहे. सदर स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व एक्वेरिस क्लबचे खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये निधी कुलकर्णीने 50 मी. बटरफ्लाय, 200 मी. बटरफ्लायमध्ये 2 सुवर्ण तर 100 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य पदक पटकाविले. तन्वी पैने 50 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये सुवर्णपदक तर वेदांत मिसाळेने 100 व 200 मी. बटरफ्लायमध्ये 2 रौप्य तर 50 मी. बटरफ्लायमध्ये कास्यपदक पटकाविले. निधी कुलकर्णी ही केएलएस पब्लीक स्कूलची विद्यार्थिनी, तन्वी पै ही केएलईची तर वेदांत मिसाळे हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी आहे. या तिनही जलतरणपटूंना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर व विनायक आंबेवाडीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article