कला उत्सव स्पर्धेत पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
वार्ताहर/ कुडाळ
कला उत्सव ही कलाविषयक शासकीय स्पर्धा राज्य स्तरावर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागा मार्फत राबविली जाते. या स्पर्धेत एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. शास्त्रीय गायन स्पर्धेत सुमन गोसावी याने प्रथम क्रमांक मिळविला. तर शास्त्रीय वादनामध्ये प्रथम क्रमांक पवन प्रभू व पखवाज वादनात प्रथम क्रमांक श्रुतीका मोर्ये हिणे मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पाट हायस्कूलच्या कै. एकनाथ ठाकुर कला अकादमी मार्फत विविध कलाविषयक उपक्रम राबविले जातात. त्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे दरवर्षी राज्य स्तरावर विविध कला प्रकारात ही मुले यश संपादन करीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी यांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, कला शिक्षक संदीप साळसकर आदी उपस्थित होते.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पाट पंचक्रोशीत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.