महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनच्या सोहम देशमुखचे यश

04:33 PM Sep 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

दिनांक 19 व 20 सप्टेंबर, 2024 रोजी पणजी, गोवा येथे झालेल्या Blitz Open Rating Chess Tournament मध्ये सोहम देशमुखने 13 वर्षा खालील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे . ही स्पर्धा एकूण 11 राऊंडची झाली. त्यामध्ये सोहमने 7 राऊंडमध्ये विजय मिळविला. ही स्पर्धा कै.श्रीमती सुनंदाबाई दयानंद बांदोडकर मेमोरियल यांच्यावतीने व तीसवाडी तालुका चेस असोसिएशन यांच्यामार्फत या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला संपूर्ण भारतामधून 214 स्पर्धक विविध राज्यांमधून आलेले होते.याकरितात्याला पालकांचे, प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat sindhudurg # news update
Next Article