राज्य विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्गचा डंका
सावंतवाडी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सावंतवाडी येथील कवयित्री, समीक्षक डॉ. शरयू आसोलकर, फोंडाघाट येथील कवी डॉ. महेश केळुसकर, कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानचे वामन मधुसुदन पंडित, सावंतवाडी येथील निवृत्त शिक्षक म. ल. देसाई, वेंगुर्ले येथील लेखिका वृंदा कांबळी यांची निवड झाली आहे.डॉ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कविता, समीक्षा, संपादन क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. तुटलेपण बांधून घेताना हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशितआहे. या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱयांवर त्यांनी पीएचडी केली आहे. डॉ. महेश केळुसकर हे मूळ फोंडाघाट-कणकवली येथील असून त्यांच्या क्रमश, ‘यू कॅन ऑल्सो विन’ या कादंबऱया प्रसिद्ध असून कवडसे, कवितांया गावा जावे, झिनझिनाट, निद्रानाश, पहारा, मस्करिका, मी आणि माझा बेंडबाजा, मोर, रोझ डे हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कलमबंदी-साहित्य आणि समीक्षा, ािात्रकथी-पिंगुळीतील लोककथा, जोर की लगी यार-कथासंग्रहृ भुता आंबा आणि इतर गोष्टी-बालसाहित्य, मधुमंगेश कर्णिक-सृष्टी आणि दृष्टी, व्हय म्हाराजा-ललित, साष्-टांग नमस्कार-विनोदी आदी साहित्य प्रकाशित आहे. वामन मधुसुदन पंडित हे मुद्रक, प्रकाशक, संपादक, रंगकर्मी, निसर्ग अभ्यासक आहेत. महाराष्ट्र मुद्रण परिषद संस्थो ते माजी कार्यकारिणी सदस्य आहेत. महाराष्ट्र मुद्रण परिषदाया मुद्रण स्पर्धी विविध पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. ‘कनक रंगवाचा’ हे त्रैमासिक ते चालवितात. वसंतराव आाारेकर प्रतिष्ठान, कणकवली या संस्थो संस्थापक, कार्यवाहृ त्यानंतर सांलक, 15 वर्षे कार्याध्यक्ष आणि आता अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. म. ल. देसाई शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ ३५ वर्षाच्या आदर्शवत सेवेतून अलिकडा निवृत्त झाले. ते दोडामार्ग तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक समस्या सरकारपर्यंत आग्रहाने मांडून सोडविल्या.