For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विज्ञान नाट्योत्सवात आर .पी .डी. चे यश

04:38 PM Aug 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विज्ञान नाट्योत्सवात आर  पी  डी  चे यश
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

देशातील तंत्रज्ञानामध्ये नवीन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड , निर्मिती कृतीयुक्त व स्व-अनुभवातून व्हावी या हेतूने राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र-पुणे , नेहरु विज्ञान केंद्र-वरळी-मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर ,विभागीय शिक्षण उपसंचालक-कोल्हापूर विभाग, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. सिंधुदुर्ग गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी , सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2024-25 चे आयोजन नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे ता. सावंतवाडी येथे करण्यात आले होते या स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कॉलेजतर्फे मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान - आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर आधारित नाट्य सादर करण्यात आले. या नाटिकेमध्ये अनुष्का गंगाराम निगुडकर, भार्गवी सुगंध साटेलकर, अस्मी प्रविण मांजरेकर , साईश तुषार बांदेकर , तनिष्का अजित राणे , वेदांत विरोचन राऊळ , श्रेयस सखाराम पालयेकर , स्वर समीर शिर्के या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , पर्यवेक्षक श्री. एस. एन. पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.