मोहित, आरोही, हर्षवर्धन यांचे यश
बेळगाव : गोवा फोंडा येथील सडा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात फिट फॉर लाईफ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पयिनशिपसह 28 सुवर्ण 19 रौप्य व 17 कांस्य अशी एकूण 64 पदकांची लयलूट केली. सदर स्पर्धेत मोहित काकतकरने मुलांच्या ग्रुपमध्ये तीन तर मुलींच्या ग्रुप तीनमध्ये आरोही अवस्थी व हर्षवर्धन कर्लेकर मुलांच्या ग्रुप पाच यांनी आपल्या गटातील वैयक्तिक विजेतेपद चॅम्पयिनशिप मिळविली.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
मुले गट क्रमांक पाच-कुमार हर्षवर्धन कर्लेकर तीन सुवर्ण, एक रौप्य, गट क्रमांक चार- कुमार अद्वैत जोशी दोन सुवर्ण एक रौप्य, तीन कांस्य, गट क्रमांक तीन- मोहित काकतकर नऊ सुवर्ण, एक रौप्य, वर्धन नाकाडीने चार सुवर्ण एक रौप्य तीन कांस्य, गट क्रमांक दोन-अथर्व अवस्थी एक सुवर्ण, दोन कांस्य, वरून जोगमनावर एक सुवर्ण, एक कांस्य, अनिश काकतकर दोन कांस्य, गट क्रमांक एक - पवन हिरेमठ दोन कांस्य पदके पटकाविली. मुलीचा गट क्रमांक चार- आरोही अवस्थी तीन सुवर्ण, चार रौप्य, एक कांस्य. गट क्रमांक तीन-निधी मुचंडी 3 सुवर्णं, सात रौप्य, अमूल्या केष्टीकर दोन सुवर्ण तीन रौप्य, दोन कास्य, श्रेया जोगमनावर एक रौप्य एक कांस्य पटकाविले.
वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, किशोर पाटील, माऊती घाडी यांचे बहुमोल मार्गदर्शन तर आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते, मोहन सप्रे व अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.