मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे यश
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. आदिती शंकर पाटीलने 40 वजनी गटात सुवर्ण, साईशा गोंडाळकरने 45 किलो वजनी गटात रौप्य, एकता राऊतने 71 किलो वजनी गटात रौप्य, श्रद्धा पाटीलने 87 अधिक वजनी गटात रौप्य, रघुवीर देसाईने 67 किलो वजनी गटात रौप्य, श्रवण खुडेने 49 वजनी गटात कास्य पदक पटकाविले. आदिती पाटीलची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा मणिपूर इम्पाल येथे होणार आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मिनी ऑलिंपिक स्पर्धा कंठीरावा स्टेडियम बेंगळूर या ठिकाणी संपन्न झाल्या.
त्यामध्ये मराठी विद्यानिकेतनच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. एकता राऊतने 71 किलो वजनी गटात सुवर्ण, वैभवी सायनेकरने फुटबॉलमध्ये बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकाविला. बसवराज हळदकर यांनी 67 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. श्रवण खुडे यांनी 42 किलो वजनी गटात कास्यपदक पटकाविले. समीक्षा हिरोजी, श्रेयस पाटील व श्रीवास मांडवकर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वरील सर्व खेळाडूंना प्रशिक्षक पूजा संताजी, क्रीडाशिक्षक महेश हगिदले, दत्ता पाटील प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन, शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर ,शिक्षण संयोजक नीला आपटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन मिळत आहे.