For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडी हायस्कूलचे यश

10:42 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडी हायस्कूलचे यश
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

मच्छे विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये खादरवाडी हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. मुलांच्या संघाने व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक तसेच खो-खोमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या संघाने खो-खोमध्ये प्रथम व कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळामध्ये श्रीकृष्ण कदम याने 1500 मीटर धावणे व 800 किलोमीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. पूल वॉल्टमध्ये गुऊनाथ पाटील प्रथम क्रमांक, कराटेमध्ये योगेश बस्तवाडकर प्रथम क्रमांक, कराटेमध्ये- भूमीत डोळेकर प्रथम क्रमांक, भालाफेक-पूजा डोळेकर प्रथम क्रमांक, तीनशे मीटर धावणे- स्वप्नाली धामणेकर प्रथम क्रमांक, पंधराशे मीटर धावणे मृदुला बस्तवाडकर प्रथम क्रमांक, 100 मीटर धावणे अनुष्का देसाई प्रथम क्रमांक, दोनशे मीटर धावणे अक्षरा नेसरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. क्रीडा शिक्षक जी. व्ही. गुरव, मुख्याध्यापक व सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.