For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश

10:38 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश
Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या जांबोटी विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारात मैदान गाजविले. वैभवी विश्वंभर गावडे हिने 1800 मीटर व 1500 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक, संजय अनंत चौगुले याने थाळीफेकमध्ये प्रथम व गोळाफेकमध्ये द्वितीय, सर्वेश संजय नाईक याने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक, तिहेरी उडीत प्रथम व चारशे मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. शालिनी अर्जुन भट हिने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक तर अपर्णा चौगुले हिने भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक, आकाश गावडे भालाफेक प्रथम क्रमांक, रुद्रेश गावडे गोळाफेक तृतीय क्रमांक, कृणाल पंडित उंच उडी द्वितीय क्रमांक, श्रद्धा गावडे शंभर मीटर धावणे द्वितीय क्रमांक, शारदा गावडे हिने शंभर मि. धावणे द्वितीय क्रमांक, श्रद्धा गावडे हिने तिहेरी उडीत द्वितीय क्रमांक, रोहिणी गावडे हिने दोनशे मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांचे प्रोत्साहन तर सहशिक्षक बी. एम. शिंदे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.