For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोजगार उपलब्ध करण्यात जि.पं.ला यश

11:12 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोजगार उपलब्ध करण्यात जि पं ला यश
Advertisement

1 कोटी 26 लाख मानवदिन रोजगार

Advertisement

बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पंचायतीला देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. जिल्ह्यामध्ये 1 कोटी 25 लाख 68 हजार 307 मानव दिन रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे दिलेले उद्दिष्ट आर्थिक वर्षामध्ये गाठण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 1 कोटी 30 लाख मानव दिन रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा पंचायतीला दिले होते. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी हे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत वेगवेगळी विकासकामे राबविली आहेत. शेतवडीतील रस्ते, गटारी, वृक्षरोप लागवडीसाठी ख•s खोदाई, तलावातील गाळ काढणे, नद्यांमधील गाळ काढणे, नाल्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे राबविण्यात आली आहेत.

या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीणमधील नागरिक रोजगारासाठी स्थलांतरित होत आहेत. हे रोखण्यासाठी ही योजना परिणामकारक ठरली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये हुक्केरी तालुक्यात सर्वाधिक 19 लाख 99 हजार 675 मानवदिन रोजगार देण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर बेळगाव तालुक्यात 14 लाख 53 हजार 582 मानवदिन रोजगार दिला आहे. सौंदत्ती तालुक्यात 11 लाख 35 हजार 42 मानवदिन रोजगार उपलब्ध केला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 1 कोटी 25 लाख 68 हजार 307 मानवदिन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. दुष्काळातीमुळे सरकारकडून मागेल त्याला रोजगार ही योजना सुरू करून प्रत्येकाला रोजगार मिळेल यादृष्टिनेही प्रयत्न सुरू  आहेत. दुष्काळामुळे नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर होऊ नये, आहे त्या ठिकाणीच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टिने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे जि. पं. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.