For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञान प्रबोधनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश

09:46 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्ञान प्रबोधनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश
Advertisement

बेळगाव : हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कब्ज बुलबुल उत्सवात ज्ञान प्रबोधन मंदिराच्या आयसीएससी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करून या स्पर्धेत सांघिक उपविजेतेपद मिळविले. राष्ट्रीय मुख्यालय भारत स्काऊट गाईड-दिल्ली यांच्यावतीने गदपुरी-हरियाणा येथे पाच दिवशीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव दि. 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आला. यामध्ये 21 राज्यातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. चित्रकला स्पर्धेत पंचम अंबाजीने द्वितीय क्रमांक मिळविला. समूहनृत्य स्पर्धेत संघाने द्वितीय, तसेच बुलबुल वृक्ष व अभिवादन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ‘भारत की थाली’ कार्यक्रमात कर्नाटक राज्याची खाद्यसंस्कृती दर्शविली. शाळेचे विद्यार्थी श्रीनिवास पाटील, आदित्य बांडगे, यश हुद्दार, पंचम अंबाजी, अर्णव पवार, प्रतीक ग्रामोपाध्ये, सुशी म्याकनमर्डी, आदिती जेरे, रेवा देऊळकर, स्वरा पाटील, पूर्वी हिरेमठ आणि तारिका नांदणीकर यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रेया हुलीकरी व अपर्णा देशपांडे यांचे मार्गदर्शन तर प्राचार्या मंजिरी रानडे व प्रशासक गोविंद वेलिंग यांचे प्रोत्साहन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.