बेळगावच्या वेदांत मिसाळेचे यश
10:55 AM Dec 05, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नवीन विक्रम
Advertisement
बेळगाव : दिल्ली येथे झालेल्या 69 व्या एसजीएफआय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सीबीएससी स्कूलतर्फे प्रतिनिधीत्व करताना संघाने 4 बाय 100 मिडले रिले स्पर्धेत नवीन विक्रम नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत या संघाने 4 बाय 400 मिडले रिलेत 4.20.60 हा नवीन विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी 4.25.45 हा जुना विक्रमा मोडीत काढला आहे. या संघात बेळगावचा वेदांत मिसाळेचा समावेश आहे. त्याला प्रशिक्षक आईवडिलांचे प्रोत्साहन मिळत आहे.
Advertisement
Advertisement
Next Article