बेळगावच्या बुद्धिबळपटूंचे स्पर्धेत यश
बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित सतीशअण्णा फॅन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सतीशअण्णा चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विविध गटातील बुद्धिबळपटूंनी यश संपादन केले आहे. या स्पर्धकांना काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत साईप्रसाद कोकाटे 7 गुणांसह 20 वा क्रमांक पटकावित यश संपादन केले. अनिरुद्ध दासारी याने बेस्ट बेळगाव हा किताब पटकाविला. अद्वैत जोशीने 8 वर्षांखालील गटात दुसरा क्रमांक पटकाविला. साईनाथ देसूरकरने 8 वर्षांखालील गटात पाचवा क्रमांक मिळविला. पारीशर्थ एस. एम. याने या गटात सातवा क्रमांक पटकाविला. माधव गुड्डण्णावरने 10 वा, शरथ पावदादने 13 वा, सारा कागवाडने 10 वर्षांखालील गटात 13 वा क्रमांक, अंशुमान शेवडेने 12 वर्षांखालील गटात दुसरा, रितेश मुचंडीकरने आठवा, गितेश सागेकरने 11 वा, अर्पिता माडिवालेने 12 वा क्रमांक पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली.