For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साऊथझोन जलतरण, डायव्हिंग स्पर्धेत आबा-हिंद क्लबचे यश

10:26 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
साऊथझोन जलतरण  डायव्हिंग स्पर्धेत आबा हिंद क्लबचे यश
Advertisement

दिशा, मयुरेश, युवराज यांना सुवर्णपदके

Advertisement

बेळगाव : बंगलोर येथे 37 व्या साउथझोन जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 4 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कास्य एकूण 9 पदकासह घवावीत यश संपादन केले. बेंगळूर येथे आयोजित साऊथ झोन जलतरण स्पर्धेत (कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा व पाँडिचेरी) भाग घेतला होता. त्यात दिशा होंडी हिने मुलींच्या ग्रुप 3 मध्ये 4×50 मी. फ्रीस्टाल रिले तसेच 4×50 मी. मिडले रिलेमध्ये 2 सुवर्णपदके संपादन केली. श्लोक जाधवने मुलांच्या ग्रुप तीनमध्ये 4×50 मी. मिडले रिलेमध्ये 1 रौप्यपदक संपादन केले.

हलसूर जलतरण तलावात झालेल्या पहिल्या साऊथ झोन डायव्हिंग स्पर्धेत भाग घेताना मयुरेश जाधव याने मुलांच्या ग्रुप एक मध्ये 1 मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग  मध्ये 1 सुवर्ण तर 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये 1 कास्यपदक संपादन केले.  युवराज मोहनगेकरने मुलांच्या ग्रुप तीन मध्ये 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये 1 सुवर्ण तर 1 मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग मध्ये 1 रौप्यपदक संपादन केले. याच गटामध्ये निल मोहितेने 1 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग व 3 मी. स्प्रिंग बोर्डमध्ये 2 कांस्यपदके संपादन केली. वेदा खानोलकर हिने मुलींच्या गट क्रमांक 2 मध्ये 100 मी. व 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळविला. वरील सर्व जलतरण व डायव्हिंगपटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून त्यांना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवराज मोहिते, अमित जाधव, संदीप मोहिते, मारुती घाडी, रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तर क्लबचे चेअरमन अॅङ मोहन सप्रे, अध्यक्ष अरविंद संगोळी, शितल हुलभते, सतीश धनूचे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.