महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणपतीपुळेत बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना वाचवण्यात यश

08:56 PM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ गणपतीपुळे

Advertisement

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना जीवरक्षक व स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. ही घटना रविवारी दुपारी १. ४५ च्या सुमारास घडली.अंशुमन पाठक (२८) व सोनू शेख (३२, दोन्ही रा. मुंबई) अशी बुडताना वाचवण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत.

Advertisement

अंशुमन शेख व सोनू शेख हे २० रोजी पर्यटनासाठी मुंबईहून गणपतीपुळे येथे आले होते. दुपारी १. ४५ च्या सुमारास दोघेही समुद्रकिनारी पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खावू लागले. यावेळी किनारी असणारे जीवरक्षक मयुरेश देवरुखकर, अजिंक्य रामाणे, आशिष माने, उमेश म्हादये, अनिकेत चव्हाण, अनिकेत राजवाडकर, व्यावसायिक निखिल सुर्वे आणि वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी समुद्रात उड्या घेत बुडणाऱ्या दोन्ही पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले. जीवरक्षकांनी वेळीच समुद्रात उड्या घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गावीत आणि पोलीस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article