For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

03:36 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश
Advertisement

पार्टीसाठी आलेला युवक शनिवारी सायंकाळी बुडाला होता

Advertisement

वार्ताहर/तुडये

हाजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा देवालय परिसरातील तिलारी धरणाच्या पाण्यात शनिवारी बुडालेल्या ओमकार नामदेव पाटील (वय 22) असे मूळचा हाजगोळी येथील व सध्या गणेशपूर-बेळगाव येथील वास्तवास असलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह शोध मोहिमेत तीन तासांच्या प्रयत्नानंतर रात्री 12 वा. हाती लागला. बेळगाव येथील एचईआरएफ रेस्क्यू टीमने पाण्यात कॅमेरे टाकून मृतदेह शोधून काढला. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम बॅटऱ्या व लाईटच्या सहाय्याने करण्याची ही पहिलीच वेळ होती. ओमकार हा आणखी दोन मित्रांसह शनिवारी दुपारी या ठिकाणी पार्टीसाठी आला होता.

Advertisement

सोबत आणलेले जेवण झाल्यानंतर तो मित्रांसह पाण्यात उतरला पाण्याचा अंदाज न आल्याने 20 ते 25 फूट खोलीच्या ठिकाणी तो बुडाला घाबरलेल्या मित्रांनी हाजगोळी येथे याची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. बेळगाव येथील एचईआरएफच्या रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ व अन्य टीमने रात्री 9 वाजल्यापासून तो बुडालेल्या ठिकाणी पाण्यात कॅमेरे टाकून मृतदेह शोध सुरू केला. तीन तासांच्या मोहिमेनंतर मृतदेह हाती लागला. चंदगड पोलिसांनी पंचनामा केला. आणि मृतदेह चंदगड ग्रामीण रुग्णालयाकडे शवचिकित्सेसाठी पाठविला. रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर हाजगोळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, बाबा, बहीण, काका असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.