For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकासाठी भरीव तरतुदी

01:05 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकासाठी भरीव तरतुदी
Advertisement

बेळगाव : रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कर्नाटक राज्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 7748 कोटी रुपयांच्या तरतुदी करण्यात आल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात रेल्वेचा विकास होणार आहे. सध्या राज्यामध्ये अंदाजे 52 हजार 950 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली. कर्नाटकातील 61 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी 2110 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे.

Advertisement

यापैकी गोकाक रोड, बागलकोट, धारवाड, मुनीराबाद रेल्वेस्थानकाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. अळणावर, बदामी, कोप्पळ व बंटावाला या रेल्वेस्थानकांचे काम प्रतीक्षेत आहे. कर्नाटकात सध्या 12 वंदे भारत रेल्वे धावत आहेत. तर 3 अमृत भारत एक्स्प्रेस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवास करता येत आहे. 97 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. गोव्यात नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने अनेक विकासकामे केली जात आहेत. तेथील तीन स्थानकांचे नूतनीकरण 65 कोटी रुपये खर्च करून केले जात आहे. त्या ठिकाणी दोन वंदे भारत धावत आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावेळी नैर्त्रुत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. आनंद, विभागीय व्यवस्थापक आशुतोषकुमार, हुबळी विभागाच्या बेला मीना आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.