For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयपॅड’चा पदार्थ

06:29 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आयपॅड’चा पदार्थ
Advertisement

विचारांच्या तंद्रीत आपण अनेकदा काहीतरी भलतेच करुन बसतो, याचा अनुभव अनेकांना आहे. एखादे काम आपण अगदी मन लावून आणि त्या कामात गर्क होऊन करत असतो. त्याचवेळी दुसरे काही काम आपल्याला आठवल्यास ते आपण करावयास जातो विचारांच्या नादात काही वेगळेच आपल्या हातून घडते. अशातून काहीवेळा गंभीर आणि धोकादायक समस्याही निर्माण होऊ शकतात. असाच अनुभव एका महिलेला नुकताच आला. यासंबंधीची महिती आता मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावरुन प्रसिद्ध होत असून लोकांना आश्चर्य वाटत आहे.

Advertisement

एका महिलेने काही काम करण्याच्या नादात असताना तिला ओव्हर सुरु करुन काही पदार्थ तयार करण्याची आठवण झाली. सुरु असलेल्या कामाच्या तंद्रीतच तिने ओव्हन सुरु केला आणि त्यात चक्क आपला जवळ ठेवलेला आयपॅड घातला आणि तो ओव्हनमध्ये भाजून काढला. सुदैवाने इतक्या उष्णतेतही त्या आयपॅडच्या बॅटरीचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा धोका टळला, याचे नंतर त्या महिलेला हायसे वाटले. ही माहिती तिच्या मुलाने नंतर सोशल मिडियावर पोस्ट केली.

आपण ही कृती हेतुपुरस्सर केली नव्हती. आपण स्वयंपाक करीत होतो आणि त्या नादात दुसरा पदार्थ भाजण्यासाठी ओव्हनमध्ये घालण्याऐवजी चुकून हाताशी असलेला आयपॅड ओव्हनमध्ये टाकला गेला. नंतर ओव्हन उघडल्यानंतर आपल्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आयपॅडची ओव्हनमध्ये अगदी दुर्दशा होऊन गेली होती. त्याच्याकडे पहावतसुद्धा नव्हते, असे या महिलेने नंतर स्पष्ट केले आहे. काही कारणास्तव या महिलेचे नाव तिच्या मुलाने प्रसिद्ध केलेले नाही. तथापि, या प्रकाराच्या व्हिडीओला असंख्य लाईक्स सोशल मिडियावर मिळालेले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.