मानसीसोबत झळकणार सुबोध भावे
अभिनेता सुबोध भावे आता लवकरच ‘वाट बघतोय रिक्षावाला’ फेम अभिनेत्री मानसी नाईकसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘सकाळ तर होऊ द्या’ आहे. मध्यप्रदेशात याचे चित्रिकरण करण्यात आले असून हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली आहे. नम्रता सिन्हा या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते विनय सिन्हा यांच्या कन्या आहेत. त्यांनी ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘नसीब’ यासारखे अजरामर हिंदी चित्रपट निर्माण केले होते.
नम्रता सिन्हा यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण पेले आहे. आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आलोक जैन यांनी या चित्रपटाचे लेखन अन् दिग्दर्शन पेले आहे. जगण्याचा मंत्र देणाऱ्या या चित्रपटात सुबोध आणि मानसी मुख्य भूमिकेत आहेत. वास्तव परिस्थितीला सामोरे जात तसेच असंख्य अडचणींवर मात करत जगण्याला नवी देणारी कथा या चित्रपटात पाहता येणार आहे. अभिषेक खणकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीतकार रोहित राऊतने संगीतबद्ध केले आहे. चित्रपटातील संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मरोडे यांनी केले आहे तर छायांकनाची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे.