For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानवापी पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल सादर

06:32 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानवापी पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल सादर
Advertisement

परिसरात सापडलेले महत्वाचे अवशेषही अहवालासह सादर

Advertisement

वृत्तसंस्था / वाराणसी

वाराणसीतील इतिहासप्रसिद्ध ज्ञानवापी परिसराच्या पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल भारतीय पुरातत्व विभागाने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाला सादर केला आहे. या अहवालासह या परिसरातून संकलित करण्यात आलेले हिंदू मूर्तींचे अवशेष आणि हिंदू प्रतीकेही बंद लखोट्यातून सादर करण्यात आली आहेत.

Advertisement

वाराणसी येथे प्राचीन काळापासून अस्त्वात असलेले भगवान महादेवाचे मंदीर पाडवून मुस्लीम आक्रमकांनी तेथे मशीद बांधली होती. त्यामुळे ही भूमी हिंदूची असून ती त्यांच्या आधीन करावी आणि तेथे मंदीर बांधण्याचा मार्ग मोकळा करुन द्यावा, अशी मागणी हिंदू पक्षकारांनी केली आहे. या परिसराची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा न्यायालयाने सर्वेक्षण करण्याचा आदेश पुरातत्व विभागला दिला होता. अनेकदा या सर्वेक्षणाला कालावधीवाढही देण्यात आली होती.

मुस्लीम पक्षकारांचा विरोध

या प्रकरणातील मुस्लीम पक्षकारांनी हिंदू पक्षकारांच्या मागणीला विरोध केला होता. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिले होते. तथापि, या न्यायालयांनीही जिल्हा न्यायालयांचा निर्णय उचलून धरला होता आणि सर्वेक्षणास अनुमती दिली होती. त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण झाले होते. आता त्याचा 1,500 पृष्ठांचा अहवाल सादर केला गेला आहे.

अहवालाची उत्सुकता

या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 डिसेंबरला होणार आहे त्यादिवशी न्यायालयात अहवालाचा लखोटा उघडला जाणार आहे. त्यानंतर त्याच्या प्रती सर्व पक्षकारांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदू पक्षकारांचे विधीज्ञ मदनमोहन यादव यांनी पत्रकारांना दिली. हा अहवाल भारतीय पुरातत्व विभागाचे विधीज्ञ अमित श्रीवास्तव यांनीं न्यायालयाला सादर केला. त्यावेळी हिंदू पक्षकारांचे विधीज्ञ मदनमोहन यादव आणि पुरातत्व विभागाचे चार अधिकारी उपस्थित होते. ज्ञानवापी परिसरात प्राचीन हिंदू मंदीर होते काय, या महत्वाच्या प्रश्नाची उकल या अहवालाच्या निष्कर्षांमधून होणार आहे. त्यामुळे सर्व देशात या अहवालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषत: हिंदू समाजात कुतुडल अधिक आहे.

Advertisement
Tags :

.