For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हे सेमिफायनल आंदोलन; पुढचे आंदोलन दणकेदार असेल’ : प्रा. सुभाष वेलिंगकर;मराठी राजभाषा निर्धार समितीचे आंदोलन

02:08 PM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
हे सेमिफायनल आंदोलन  पुढचे आंदोलन दणकेदार असेल’   प्रा  सुभाष वेलिंगकर मराठी राजभाषा निर्धार समितीचे आंदोलन
Advertisement

पणजी : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेले मराठी राजभाषा निर्धार समितीचे आंदोलन हे ‘सेमिफायनल’ असून, यापुढील आंदोलन अधिक दणकेदार असेल, असा इशारा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व मराठी राजभाषा समर्थक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला.

Advertisement

‘मराठी राजभाषा झालीच पाहिजे’ या मागणीसाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मराठी भाषेला गोव्यात अधिकृत राजभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

यावेळी प्रा. वेलिंगकर यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत सरकारला सूचक इशारा दिला. सध्याचे आंदोलन हे केवळ सुरुवात असून, आगामी काळात मराठी राजभाषेच्या मागणीसाठी अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मराठी भाषेला तिचे योग्य स्थान आणि राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठी राजभाषेचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.