सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल खेळाडूंना सुवर्ण पदक
आष्टा :
गोंदिया माँटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन द्वारा, गोंदिया येथे दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी रोजी आयोजित १२ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय माँटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, आष्टाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : अंश कुराडे, फैजान मुल्ला, सिद्धेश्वर पानसरे व पियुष शिंदे या खेळाडूंनी यश संपादन केले. सुभद्रा स्कूल हे शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या अंगी शारीरिक क्षमता ओळखून त्यांना क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यास प्रोत्साहित करणारी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्वगुण, संवेदनशीलता, एकाग्रता व जिज्ञासा वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील असणारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा देणारी आष्टा परिसरातील एकमेव सी.बी.एस.ई. बोर्ड स्कूल आहे. या खेळाडूंच्या यशाबद्दल स्कूलचे मॅनेजर व मार्गदर्शक सुमसीन कनाई म्हणाले, या यशामागे या खेळाडूंनी घेतलेले अथक परिश्रम, कष्ट त्यांच्यातील कौशल्य व क्रीडा शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन कारणीभूत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव अँड. चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर.ए. कनाई, सुमसीन कनाई, अखिल मॅथ्यू अजित सूर्यवंशी, अभिजीत कांबळे व निलेश पाटील, यांचे मार्गदर्शन मिळाले.