For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपकनिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून

06:24 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
उपकनिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)

Advertisement

येथील राजगीर हॉकी स्टेडियममध्ये बुधवार दि. 1 एप्रिलपासून हॉकी इंडियाच्या 16 व्या उपकनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 12 दिवस चालणार असून एकूण 30 संघांचा समावेश आहे.

देशातील विविध राज्यांचे हॉकी संघ या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवित आहेत. गेल्या वर्षी हॉकी इंडियाने राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या स्वरुपाची अंमलबजावणी या स्पर्धेत करणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे 30 संघ अ, ब आणि क गटात विभागण्यात आले आहेत. अ गटातील संघांमध्ये स्पर्धेच्या जेतेपदासाठी लढत होईल तर ब आणि क गटातील आघाडीच्या दोन संघांना बढती दिली जाईल. तर अ, ब गटातील शेवटच्या दोन संघांची पदावनत्ती होईल.

Advertisement

अ विभागामध्ये 12 संघांचा समावेश असून ते पुन्हा चार गटात विभागले जातील. त्यानंतर या संघांमध्ये उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामने 12 एप्रिलपर्यंत होतील. अ गटामध्ये पंजाब, चंदीगड, महाराष्ट्र, ब गटामध्ये झारखंड, दादरा-नगर हावेली आणि दिव-दमण, तामिळनाडू, क गटामध्ये उत्तरप्रदेश, हरियाणा व मणिपूर, ड गटामध्ये मध्यप्रदेश, ओदीशा आणि केरळ यांचा समावेश आहे.

ब विभागातील सामने साखळीपद्धतीने दोन गटातील संघांत खेळविले जातील. अ  विभागात दिल्ली, गुजरात, बंगाल, तेलंगणा आणि उत्तराखंड तर ब विभागात कर्नाटक, छत्तीसगड, अरुणाचलप्रदेश, हिमाचलप्रदेश आणि बिहार यांचा समावेश आहे.

क विभागातील सामने साखळी पद्धतीने गोळविले जातील. या विभागातील अ गटात आंध्रप्रदेश, मिझोराम, पुडुचेरी आणि आसाम, ब गटामध्ये गोवा, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सामन्यात जिंकण्याला संघाला तीन गुण तर सामनाबरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण तसेच पराभूत संघाला एकही गुण मिळणार आहे. अ विभागातील बाद फेरीतील सामने बरोबरीत राहिल्यास त्यांचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये केला जाईल.

बुधवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आंध्र आणि आसाम यांच्यातील सामना सकाळी 7 वा., मिझोराम आणि पुडुचेरी यांच्यातील सामना 8.45 वा., तिसरा सामना गोवा आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सकाळी 10.30 वा., ब विभागातील दिल्ली आणि तेलंगणा यांच्यातील सामना सकाळी 7 वा., गुजरात आणि उत्तराखंड यांच्यातील सामना सकाळी 8.45 वा., कर्नाटक आणि हिमाचलप्रदेश यांच्यातील सामना 10.30 वा., तसेच छत्तीसगड व बिहार यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता होईल.

Advertisement
Tags :

.