For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

रशियात एसयू-30 लढाऊ विमान कोसळले

06:45 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशियात एसयू 30 लढाऊ विमान कोसळले
Advertisement

सुदैवाने दोन्ही वैमानिक बचावले

Advertisement

वृत्तसंस्था/मॉस्को

रशियाच्या कॅलिनिनग्राड प्रदेशातील चेर्न्याखोव्स्क जिह्यात प्रशिक्षण उ•ाणादरम्यान एक एसयू-30एसएम लढाऊ विमान कोसळले. हे विमान तिमोफीव्का आणि झेल्योनोई बोर या गावांच्या दरम्यान कोसळले. दोन्ही वैमानिकांनी वेळेवर बाहेर उडी मारल्याने ते सुदैवाने बचावले. त्यांना जखमी अवस्थेत लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसयू-30एसएम हे ‘इर्कुट’द्वारे (युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचा एक भाग) उत्पादित केलेले दोन आसनी बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हे रशियन एरोस्पेस फोर्सेस आणि नौदल हवाई दलात हवाई संरक्षण, हल्ला आणि सागरी हल्ल्याच्या भूमिकांमध्ये कार्यरत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने विमान अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अपघातसमयी या उ•ाणात कोणताही दारुगोळा नव्हता. तसेच विमान निर्जन भागात कोसळल्याने दोन्ही वैमानिकांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.